तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:46 AM2018-02-09T11:46:31+5:302018-02-09T11:46:37+5:30

Taloda taluka: banana damage due to environmental change | तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

तळोदा तालुका : वातावरण बदलामुळे केळीचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : वातावरणातील बदलामुळे तळोद्यात केळीवर करपा रोगाचा  प्रादुर्भाव झाला आह़े या मुळे परिसरातील केळी उत्पादक हवालदिल झाले आहेत़ कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आह़े
गेल्या वर्षी केळीस चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे वाढला होता़ साहजिकच केळीच्या क्षेत्रातही वाढ झाली आह़े कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तळोदा तालुक्यात साधारणत 500 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आह़े रासायनिक व सेंद्रिय खतांचा पुरेसा वापर, शिवाय वेळोवेळी मशागत केल्याने केळीचे पिक समाधानकारक स्थितीत                होत़े 
दरम्यान, गेल्या महिनाभरापासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे केळीवर मोठय़ा प्रमाणात करप्याचा प्रादुर्भाव पसरत आह़े या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते, त्याचबरोबर हिरवे पानदेखील पिवळे पडत आहेत़ परिणामी केळीचा दर्जा खालावत आह़े शिवाय यामुळे केळीचे घड अपरिपक्व असतानाच पिकायला लागत आहेत़ शेतकरी आपला माल लांबच्या बाजारपेठेर्पयत पाठवत असल्याने तोर्पयत तो टिकवणेदेखील महत्वाचे असत़े परंतु करप्यामुळे केळी बाजारपेठेत नेत असतानाच तिचा दर्जा खालावत आह़े त्यामुळे शेतक:यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आह़े 
आधीच शेतक:यांनी केळीसाठी रासायनिक खते, ठिबक सिंचन, टिश्यू, मशागत, किटकनाशक यासाठी पैसा खर्च करण्यात आला आह़े मात्र आता करप्याचा वाढता प्रादुर्भावामुळे केळीसाठी लावण्यात आलेला खर्च तरी निघणार की नाही? असा प्रश्न शेतक:यांपुढे आह़े वास्तविक करपा हा रोग वर्षानुवर्षे केळी पिकाला लक्ष करीत असतो़ त्याचा नायनाट करण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचाही वापर करीत असतात़ 
परंतु हा रोग संधीसाधु, बुरशीजन्य असल्याने तो लगतच्या पिकालाही सहज प्रभावित करु शकतो़ त्यामुळे कृषी विभागाने संपूर्ण परिसरात सामुहिकरित्या करपा रोगाचे निमरुलन करणे आवश्यक असल्याचे  म्हटले जात आह़े या शिवाय शेतक:यांना सवलतीत किटकनाशके पुरविण्याचेही शेतक:यांची अपेक्षा आह़े चार वर्षापूर्वी अशा प्रकारची किटकनाशके शेतक:यांना दिली जात होती़ परंतु आता ते बंद करण्यात आल्याने शासनाच्या धोरणाबाबत शेतक:यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े 

Web Title: Taloda taluka: banana damage due to environmental change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.