तळोदा तालुका : पंचनामे पूर्ण झाले नसतानाही अनुदानाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:20 PM2018-01-22T12:20:51+5:302018-01-22T12:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़े
तळोदा तालुक्यात सहा हजार 146 शेतक:यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली होती़ साधारण चार हजार 575 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा करण्यात आला होता़ त्यात तीन हजार 13 हेक्टर जिरायत म्हणजे कोरडवाहू तर एक हजार 562 हेक्टर क्षेत्र बागायती होत़े गेल्या वर्षी कपाशीचे चांगले उत्पादन आले होत़े त्यामुळे यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे अधिक वाढला होता़ परिणामी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कपाशीची लागवड अधिक करण्यात आली होती़ याशिवाय तूट पावसामुळे शेतक:यांच्या रासायनिक खतांच्या नियोजनामुळे कपाशीची प्रचंड वाढ झाली होती़ त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होत़े दरम्यान, बीटीच्या बोगस वाणामुळे बोंडअळीच्या प्रचंड प्रादुर्भाव झाला़ संपूर्ण पीकच नष्ट झाले आह़े कापसाचे बोंड फुटल्याबरोबर त्या बोंडमधील संपूर्ण रुई ही अळी फस्त करीत असत़े अळीच्या नायनाटासाठी शेतक:यांनी कीटक नाशकांचा वापर केला होता़ परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरीही पूर्ण हतबल झाला होता़ तरीही शेतक:यांच्या हाती काहीच लागले नव्हत़े बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे संपूर्ण पीकच नष्ट झाल्यामुळे शेतक:यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती़ या पाश्र्वभूमिवर स्थानिक महसूल विभागाने येथील कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार कृषी विभागाने आपल्या यंत्रनेमार्फत पंचनाम्याची कार्यवाही करुन नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला़ या अहवालानुसार सहा हजार 146 शेतक:याचे चार हजार 575 हेक्टर 54 आर क्षेत्रावर कापसाचे नुकसान झाल्याचा अहवाल नमूद करण्यात आले आह़े नुकसानग्रस्त शेतक:यांना कापसाच्या नुकसान भरपाईपोटी सात कोटी 33 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मागविण्यात आले आह़े तसा अहवाल तळोदा येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आह़े आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची अपेक्षा आह़े आधीच शेतक:यांनी पिकाच्या लागवडीपासून ते पिक वाढीसाठी लागणारा खर्च यावर प्रचंड पैसा खर्च केला आह़े या आर्थिक फटक्यातून थोडाफार हातभार लागण्यासाठी शासनाने बोंडअळीग्रस्तांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े