तळोदा तालुका : 13 ग्रामपंचायतींची ‘जनसुनावणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:22 PM2018-02-06T13:22:59+5:302018-02-06T13:23:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांबरोबर व इतर योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक ऑडीट झाल्यानंतर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींनी त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध न करून दिल्याने त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. त्या वेळी या ग्रामपंचायतींना कागद पत्रांची पूर्तता करण्याचे आदेश उपस्थित प्रमुख अधिका:यांनी दिले.
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांबरोबरच इतर योजनेतून ही केलेल्या कामांचे सोशन ऑडीट करण्यासाठी शासनाच्या सामाजिक अंकेक्षन संचालनालयतर्फे करण्यात आले. यासाठी साधारण 60 अंकेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना चार दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. हे अंकेक्षण गेल्या महिन्यात प्रत्यक्ष जागेवर जावून ग्रामस्थांचे व मजुरांचे जबाब नोंदवून करण्यात आले होते. साहजिकच यामुळे कामांमधील पारदर्शकता आढळून आली आहे. तळोदा तालुक्यात 40 ग्रामपंचायतींचे ऑडीट 14 जानेवारी ते 22 जानेवारी व 23 जानेवारी ते 30 अशा दोन टप्प्यात करण्यात आले होते. यातील रेवानगर, रापापूर, त:हावद, धनपूर, माळदा, नवागाव, कढेल, धानोरा, मोड, नर्मदानगर, सरदार नगर, बुधावल अशा 13 ग्रामपंचायतींनी सामाजिक ऑडीट दरम्यान, या ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड परिपूर्ण नव्हते. शिवाय बिलांची तारीख, बिल क्रमांक अशा उणिवा आढळून आल्यानंतर या कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींची जनसुनवाई शुक्रवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली होती. सुनवाईत या विभागाचे तालुका समन्वयक नीलेश इंगोले यांनी प्रत्येक ग्रामपंचायत नुसार कागद पत्रांची अपूर्तताविषयी अधिका:यांसमोर वाचन केले. त्यानंतर संबंधित अधिका:यांनी सांमाजिक अंकेक्षण विभागाला जी कागदपत्रे हवी आहेत ती तातडीने देण्यासाठी पंचायत समितीकडे पाविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्व ग्रामपंचायतींचा अहवाल अंकेक्षण संचालनालयास पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पुढील कार्यावाही विषयी ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.
या जनसुनवाईत तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी शरद मगरे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.डी. सोनवणे, जनसुनावणी अधिकारी अजरुन गुडदे, वनक्षेत्रपाल सी.डी. कासार, कल्याणी बालिका आश्रमाच्या अध्यक्षा वंदना तोरवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, सामाजिक संचलनालयाचे जिल्हा समन्वयक नितीन शेजूळकर, एल.एन.चक्रनारायण, शुभांगी खरताडे, प्रकाश भोई, सखाराम वळवी, प्रमोद वाणी, अव्वल कारकून पी.एस. पेंढारकर आदींसह संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सोशल ऑडीट करणारे अंकेक्षक उपस्थित होते. दरम्यान या सामाजिक अंकेक्षणा दरम्यान, नागरिकांनीही मोठय़ा उत्साहात सोशल ऑडीटची माहिती जाणून घेतली होती. त्यामुळे या विभागाच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.