तळोद्याचा बैल बाजाराची दुष्काळातही सुसाट घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 11:42 AM2019-01-03T11:42:05+5:302019-01-03T11:42:10+5:30

नंदुरबार : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पशुमेळाव्यात केवळ 2 दिवसात 1 कोटी रुपयांची उलाढाल ...

Talodha bullock cartoons in the market drought | तळोद्याचा बैल बाजाराची दुष्काळातही सुसाट घोडदौड

तळोद्याचा बैल बाजाराची दुष्काळातही सुसाट घोडदौड

Next

नंदुरबार : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पशुमेळाव्यात केवळ 2 दिवसात 1 कोटी रुपयांची उलाढाल झाली आह़े दुष्काळतही सुसाट सुटलेल्या या पशुमेळाव्यात सर्वाधिक महागडी बैलजोडी हीे 71 हजार रुपयांना शेतक:याने खरेदी केली़  
महाराष्ट, गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतक:यांची पसंती ठरणा:या तळोदा बैलबाजारात दरवर्षी नवीन वर्षाच्या आरंभी पशुमेळा घेण्याची परंपरा आह़े व्यापा:यांच्या आग्रहाखातर बाजार समितीकडून या बाजाराचे आयोजन करण्यात येत़े यंदा दुष्काळ असल्याने या मेळाव्याला शेतक:यांकडून प्रतिसाद मिळण्याची शाश्वती नसतानाही केवळ दोन दिवसात 1 हजार 100 बैलांची आवक होऊन त्यांची जोरदार विक्री झाली आह़े प्रामुख्याने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात संगोपन करण्यात आलेल्या खिल्लारी, गावठी, नागोरी आणि मावची या प्रकारच्या बैलांना येथे मोठी मागणी आह़े या बैलांची खरेदी करण्यासाठी जळगाव, धुळे, औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापा:यांसह गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतकरी दोन दिवसांपासून येथे तळ ठोकून आहेत़ शुक्रवार्पयत सुरु राहणा:या मेळाव्यात आणखी किमान 60 ते 70 लाखांचे पशुधन विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े तूर्तास आवक झालेल्या निम्म्यापेक्षा अधिक बैलांची विक्री झाल्याने बाहेरगावाहून आलेले व्यापारी आठवडे बाजारानिमित्त होणा:या बैलांच्या आवकसाठी बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये मुक्काम करत असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आह़े 
जिल्ह्यातील प्रमुख बैल बाजार असल्याने याठिकाणी जिल्ह्यातून शेतकरी बैलविक्रीसाठी घेऊन जात आहेत़ 
तीन दिवसांपासूून सुरु असलेल्या बैलबाजारामुळे या परिसराला यात्रोचे स्वरुप आले असून किरकोळ व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस आले आहेत़ हा पशुमेळावा वाढीव दिवसांचा करावा अशी अपेक्षा गुजरात राज्यातून आलेल्या शेतक:यांनी केली़ बाजार समिती आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यावतीने बुधवारी पशुपालक शेतक:यांना मार्गदर्शन करण्यात आले होत़े31 डिसेंबर रोजी सायंकाळर्पयत पशुमेळाव्यासाठी 1 हजार 100 बैलांची आवक झाली होती़ यातून बुधवारी सायंकाळर्पयत 650 बैलांची विक्री करण्यात आली होती़ प्रामुख्याने शेतकरीच शेतक:यांकडून बैल घेत असल्याने या बाजारात चैतन्य असत़े बुधवारी दिवसभरात उमराणी ता़ धडगाव येथील ठुमला नाचा पावरा यांची गावठी जातीची बैलजोडी मोवी ता़ सागबारा, जि़ नर्मदा (गुजरात) येथील शेतकरी नरपतभाई बहाराभाई वसावा यांनी 71 हजार रुपये देऊन खरेदी केली़ तत्पूर्वी मंगळवारी सायंकाळर्पयत चुलवड ता़ धडगाव येथील विरसिंग सरदार पावरा यांची बैलजोडी गुजरात राज्यातील सिंगा वसावा या शेतक:याने 60 हजार रुपयांना खरेदी केली होती़ 
 

Web Title: Talodha bullock cartoons in the market drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.