टँकरमुक्त नंदुरबार जिल्ह्याचे स्वप्न यंदाही मृगजळच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:13 PM2018-03-29T12:13:33+5:302018-03-29T12:13:33+5:30
77 गावे टंचाईग्रस्त : बोदलापाडय़ाला टँकर सुरू होणार
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : टँकरमुक्त जिल्ह्याचे स्वप्न यंदाही केवळ एक गाव व पाडय़ामुळे अपुर्ण राहणार आहे. धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा येथे पुढील आठवडय़ात टँकर सुरू करावे लागणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील 77 गावे व नऊ पाडय़ांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पजर्न्यमान ब:यापैकी झाले आहे. शिवाय भुगर्भातील पाणी पातळी देखील ब:यापैकी आहे. ही बाब लक्षात घेता यंदा केवळ नंदुरबार तालुक्यातील 51, शहादा तालुक्यातील 25 व नवापूर तालुक्यातील एक गाव आणि धडगाव तालुक्यातील चार, शहादा तालुक्यातील तीन तर नवापूर व नंदुरबार तालुक्यातील प्रत्येकी एका पाडय़ाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जवळपास एक लाख 50 हजार 476 लोकख्येला पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. त्यासाठी यंदा 104 कोटी 61 लाख रुपयांचा कृती आराखडा देखील मंजुर करण्यात आला आहे.
गौ:याचा बोदलपाडा
धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा हे गाव व पाडे गेल्या दहा वर्षापासून टंचाईग्रस्त आहे. प्रशासनाने या गावात विहिर खोदली, चार हातपंप केले परंतु उन्हाळ्यात ते सर्व कोरडे होत असतात. नैसर्गिक दुसरे कुठलेही पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे या गाव व पाडय़ातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे येथे टँकर सुरू करण्याशिवाय पर्याय उरत नाही. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून केवळ याच गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते.
सध्याच्या स्थितीत येथील विहिर व हातपंप देखील कोरडे झाले आहेत. या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी नुकताच घेतला आहे. त्यानुसार येथे पुढील आठवडय़ापासून टँकरने पाणी पुरवठा करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार टँकरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
68 ठिकाणी अधिग्रहण
जिल्ह्यात आतार्पयत एकुण 68 ठिकाणी विहिरी, विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्याद्वारे त्या त्या गावांच्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. खासदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी टंचाईच्या कामात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सुचना यापूर्वीच प्रशासनाला केलेल्या आहेत.
अधिग्रहण केलेल्यांमध्ये नंदुरबार तालुक्यात 46 ठिकाणी, शहादा तालुक्यात 20 ठिकाणी तर धडगाव तालुक्यात दोन ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे. 13 ठिकाणी विहिर, विंधन विहिर देखील घेण्यात आल्या आहेत.