दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

By admin | Published: February 8, 2017 10:13 PM2017-02-08T22:13:15+5:302017-02-08T22:13:15+5:30

सरासरी इतका पाऊस होऊनही टंचाई : 180 गावे व 400 पाडय़ांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट

Tankers for two ponds this year will be required | दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

दोन पाडय़ांना यंदाही लागणार टँकर

Next



नंदुरबार : गेल्या दहा वर्षापासून नियमित पाणी टंचाई जाणवणा:या धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमालपाडा या दोन्ही पाडय़ांना यंदाही टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. यामुळे मात्र, जिल्हा टँकरमुक्तची प्रशासनाची तयारी  वाया जाणार असल्याचे यंदाही स्पष्टच आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीचा तुलनेत 90 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तीन तालुक्यांमधील सरासरीही ओलांडण्यात आली आहे. परिणामी यंदा पाणी टंचाईची स्थिती फारशी राहणार नसल्याचे सांगण्यात येत   होते. परंतु शहादा तालुक्यातील 135 आणि नंदुरबार तालुक्यातील 15 अशी दीडशे गावांची पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर केल्याने तो भाग दुष्काळी जाहीर करण्यात आला   आहे.
याशिवाय भुजल पातळी आणि इतर सव्रेक्षणानुसार यंदाच्या उन्हाळ्यात टंचाई जाणवणा:या गावांचीही यादी तयार करण्यात आली आहे.
दोन्ही पाडे कायमस्वरूपी
जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील दोन पाडे वगळता एकाही गावाला किंवा पाडय़ाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ गेल्या 15 वर्षात आलेली नाही. त्यामुळे टँकरमुक्त जिल्हा अशी बिरुदावली जिल्हा मिरवत असला तरी या दोन पाडय़ांमुळे त्याला खिळ बसत असल्याची स्थिती आहे. गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील अनेक भागात हजारो टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु नंदुबार जिल्ह्यात तशी वेळ आलेली नव्हती. यंदा तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी टंचाईची शक्यता मावळली होती.
भौगोलिक स्थिती अडसर
धडगाव तालुक्यातील गौ:याचा बोदलपाडा हा पाडा  बिजरी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो तर गुगलमालपाडा हा वोरोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येतो. गौ:याचा बोदलापाडा आणि गुगलमाडा या पाडय़ांची भौगोलिक स्थिती तीव्र चढाव आणि तीव्र उताराची आहे.    त्यामुळे त्या ठिकाणी कूपनलिका करता येत नाही. काही वर्षापूर्वी पाडय़ालगत वाहणा:या नाल्यात कूपनलिका करण्यात आली, परंतु तिचा काहीही उपयोग झाला नाही. परिणामी टँकरशिवाय या दोन्ही पाडय़ांना पर्याय उरत नसल्याची स्थिती आहे.
पहिल्या टप्प्यात निरंक
पाणी टंचाईचे नऊ महिन्यातील तीन टप्पे करण्यात येतात. पहिला टप्पा हा ऑक्टोबर ते डिसेंबरचा असतो. दुसरा जानेवारी ते मार्च आणि तिसरा एप्रिल ते जून असा असतो. यंदा पहिल्या टप्प्यात एकाही गावाला पाणी टंचाई जाणवली नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
आता दुस:या टप्प्यात 109 गावे आणि 396 पाडय़ांवर पाणी टंचाई जाणवत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखडादेखील तयार करण्यात आला आहे.
तृतीय सत्रात 71 गावे आणि चार पाडय़ांवर पाणी टंचाई राहण्याची शक्यता आहे. दोन्ही टप्पे मिळून एकूण 180 गावे आणि 400 पाडय़ांना यंदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
साडेचार कोटींचा खर्च
जिल्ह्यात यंदा पाणी टंचाई उपाययोजनांवर जवळपास चार लाख 47 हजार 62 हजार रुपये अंदाजीत खर्च होणार असल्याचे स्पष्ट    करण्यात आले आहे. 180 गावे आणि 400 पाडय़ांसाठी एकूण    पावणेसहाशे योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात विहीर खोल करणे, विहिरीतून गाळ काढणे दोन ठिकाणी, खाजगी विहीर व कूपनलिका यांचे अधिग्रहण करणे याचे 54 ठिकाणी प्रस्तावित आहे. त्यात दुस:या टप्प्यात 36 तर तिस:या टप्प्यात 18 ठिकाणांचा समावेश   आहे.
 प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याचे सात ठिकाणी प्रस्तावित असून दुस:या टप्प्यात एक तर तिस:या टप्प्यात सहा ठिकाणांचा समावेश आहे. विंधन विहीरी घेण्याचे 511 ठिकाणी नियोजन आहे.
 त्यात दुस:या टप्प्यात 461 तर तिस:या टप्प्यात 50 ठिकाणांचा समावेश आहे. याशिवाय तात्पुरत्या पुरक नळ पाणी पुरवठा योजना चार ठिकाणी नियोजित   आहेत.


भौगोलिक परिस्थिती
जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गाव व पाडय़ांर्पयत जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे अशा ठिकाणी कूपनलिकेची यंत्रणा जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासनाला उपाययोजना करण्यास मोठी कसरत करावी लागत असते.

सर्वाधिक गावे नंदुरबार तालुक्यातील
यंदा दुस:या व तिस:या टप्प्यात पाणी टंचाई जाणवणा:या सर्वाधिक गावांची संख्या ही नंदुरबार व तळोदा तालुक्यातील आहे. तर सर्वाधिक पाडय़ांची संख्या धडगाव तालुक्यातील आहे. नंदुरबार तालुक्यातील 50 गावे व एक पाडा, नवापूर तालुक्यातील 23 गावे व एक पाडा, शहादा तालुक्यातील 33 गावे व सहा पाडे, तळोदा तालुक्यातील 44 गावे, अक्कलकुवा तालुक्यातील 30 गावे व 175 पाडे आणि धडगाव तालुक्यातील 217 पाडय़ांचा समावेश आहे. एकुण 180 गावे व 400 पाडय़ांचा टंचाई निवारणार्थ 580 उपाययोजना राबविण्यात येणार       आहे.

Web Title: Tankers for two ponds this year will be required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.