तापी काठावर चारा छावण्या करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:50 PM2018-10-20T12:50:36+5:302018-10-20T12:50:41+5:30

दुष्काळी गावांमध्ये पहाणी : पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश, शेतक:यांनी मांडल्या व्यथा

On the Tapi edge, fodder camps will be done | तापी काठावर चारा छावण्या करणार

तापी काठावर चारा छावण्या करणार

Next

नंदुरबार : जिल्ह्यात चा:याची गंभीर टंचाई निर्माण झाल्यास प्रसंगी तापी काठावरील गावांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी तयारी ठेवावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मजुरांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे अशा सुचना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध गावांमध्ये दुष्काळी पहाणी दौ:याप्रसंगी दिल्या. शेतक:यांनी पिण्याचे पाणी, वाया गेलेले पीक, जनावरांसाठी चारा याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. 
दुष्काळी गावांच्या पहाणीसाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार व शहादा तालुक्यातील आठ गावांना भेटी दिल्या. गाव शिवारात जावून त्यांनी पिकांची पहाणी केली. शेतक:यांशी, ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतक:यांनीही त्यांना विविध समस्या मांडून मागण्या केल्या. पालकमंत्री रावल यांच्यासह आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात दुष्काळी गंभीर स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना दुष्काळी गावांची पहाणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आपण पहाणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी पालकमंत्र्यांनी न्याहली गावाला भेट दिली. तेथील शेतक:यांशी संवाद साधला. गेल्या सहा ते सात वर्षापासून सतत दुष्काळाची स्थिती आहे. पिकांसह पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागते. गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी योजना तयार करावी अशी मागणी देखील यावेळी शेतकरी व गावक:यांनी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पहाणी           केली. 
तेथून बलदाणे येथे गेल्यावर शेतक:यांनी  पाऊसच नसल्यामुळे अमरावती नाला प्रकल्प देखील कोरडाच पडला आहे. त्याचा शेतक:यांना काहीएक उपयोग नाही. यासाठी तापी-बुराई प्रकल्पाला गती देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तेथून भादवड, सातुर्के या गावांना त्यांनी भेटी दिल्या. 
शहादा तालुक्यातील पुसनद, अनरद, सावळदे, कौठळ येथील शेतांमध्ये जावून त्यांनी पिकांची पहाणी केली. नंदुरबार तालुका, शहादा तालुका, नवापूरसह तळोदा तालुक्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आतापासूनच उपाययोजना करण्याच्या सुचना    त्यांनी दिल्या. खरीप पिकांची   अवस्था बिकट झालेली आहे.  त्यामुळे जनावरांना चारा देखील उपलब्ध होणे कठीण आहे. त्यामुळे आधीच पर राज्यात चारा              वाहतुकीला बंदी घातली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. जनावरांसाठी नंदुरबार व शहादा तालुक्यात तापी काठावर  चारा छावण्या उभारण्यासाठी नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ.अर्चना पठारे, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी.डी.जोशी, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, अनिकेत पाटील, जिल्हा अधीक्षक                कृषी अधिकारी बी.एन.पाटील, तहसीदार नितीन पाटील, मनोज खैरनार, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, नंदुरबार बाजार समितीचे उपसभापती हरिश्चंद्र पाटील, जि.प.सदस्य जयपाल रावल, अनिल भामरे आदींसह त्या त्या गावाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व इतर अधिकारी उपस्थित होते.
 

Web Title: On the Tapi edge, fodder camps will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.