‘तापी-बुराई’ला अडथळ्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:36 AM2018-10-22T11:36:00+5:302018-10-22T11:36:06+5:30

20 वर्षात पहिला टप्पाही पूर्ण नाही : वनजमीन, खाजगी जमीन आणि वीज बिलांचा प्रश्न

'Tapi-Evil' is a barrier to obstacles | ‘तापी-बुराई’ला अडथळ्यांचा डोंगर

‘तापी-बुराई’ला अडथळ्यांचा डोंगर

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तापी पाटबंधारे विकास महामंडळाने फेब्रुवारी 1999 मध्ये मंजूर केलेली तापी-बुराई उपसा योजना अडचणींच्या डोंगरात उभी आहे. साठवण तलावांसाठी वन जमीनी मिळविण्याचा प्रश्न, निधीची अपुरी तरतूद, पंपगृहांसाठी लागणारी विजेची तरतूद आदी समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे ही योजना एक मृगजळच ठरते की काय अशी अवस्था आहे. 20 वर्षात पहिला टप्पाही पुर्ण होऊ शकला नाही. यावरूनच या योजनेचे भवितव्य स्पष्ट होते.
नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील अवर्षण प्रवण गावांसाठी जिवनदायी ठरणारी तापी-बुराई योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 2 फेब्रुवारी 1999 ला मान्यता दिली होती. नदीजोड प्रकल्प म्हणूनही देखील या योजनेकडे पाहिले जाते. 
तीन तालुक्यांना लाभदायी
ही योजना तीन तालुक्यांना लाभदायी ठरणार आहे. नव्या आराखडय़ानुसार बलदाणेचे अमरावतीनाला धरण भरण्यात आल्यास (66 दशलक्ष घनमीटर पाणी) पूर्वेकडील नेहमीच अवर्षण  प्रवण असलेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे. शनिमांडळ लघु पाटबंधारे प्रकल्पातून अमरावती नदीद्वारे पाणी नेवून मालपूर, ता.शिंदखेडा येथील अमरावती मध्यम प्रकल्पात (10 दशलक्ष घनमीट पाणी)पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे शनिमांडळ ते वैंदाणे-मालपूर या दरम्यान ही नदी बारमाही प्रवाहीत राहील. शनिमांडळ प्रकल्पातून पुढे बुराई प्रकल्पात अर्थात वाडी-शेवाडी (सहा दशलक्ष घनमीटर) पाणी नेले जाणार आहे. तेथून बुराई नदी बारमाहीचा प्रय} आहे. 
वनजमीनीचा प्रश्न
पहिल्या टप्प्यातील निंभेल प्रकल्पासाठी वन जमिनीचा प्रय} करावा लागणार आहे. खाजगी सल्लागारामार्फत वनजमीन संपादनासाठी निवेदेनुसार कार्यवाही सुरू आहे. वनजमीन संपादन करण्यासाठी पर्यायी जमिनीसाठी प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. तर खाजगी जमीन मिळविण्यासाठी      90 टक्के खातेदार शेतक:यांचे संमतीपत्र पाटबंधारे विभागाकडे आलेली आहेत. दर निश्चिती होऊन शेतक:यांना मोबदला दिला जाणार आहे.
पंपगृहांना लागणार वीज
या योजनेअंतर्गत तापीपात्रात हाटमोहिदा, निंबेल, आसाणे व शनिमांडळ येथे पंपगृह उभारावे लागणार आहे. पंपाद्वारे पाणी  पुढे नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विजेची आवश्यकता लागणार                 आहे. राज्य विद्युत मंडळातर्फे 10 मे.व्ॉ.वीज उपलब्ध करून देण्यास सहमती मिळविण्यात आली आहे. विद्युत खर्चासाठी 27 कोटी रुपये प्रस्तावीत करण्यात आले                आहेत. त्यानंतर योजना सुरू  झाल्यावर पंपगृहांसाठी लागणा:या विजेचा बिलाचा प्रश्न उपस्थित होणार आहे.प्रकाशा बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या डाव्या तिरावरुन इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाव्दारे 41.47 दलघमी पाणी उचलणे प्रस्तावित आहे. जॅकेवल पासून 1600 मी. मी. व्यासाचा एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे पहिला टप्पा द्वारे निभेंल साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 1204 हेक्टर इतकी आहे. 
दुसरा टप्पा 1550 मी. मी. व्यासाच्या एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे आसाणे साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 2339 हेक्टर इतकी आहे.
तिस:या टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील शनिमांडळ तालवात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 354 हेक्टर इतकी आहे. 
चौथ्या  टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील बुराई मध्यम प्रकल्पात पाणी  पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिचंन क्षमता 3188 हेक्टर आहे.  निभेंल व आसाणे साठवण तलाव बांधणे प्रस्तावित आहे. 
निंभेल व आसाणे या नवीन साठवण तलावाची तसेच ल.पा.यो. शनिमांडळ व बुराई मध्यम प्रकल्पाची वाढीव व साठवण क्षमता 7085 हे. असून 3429 हे.सिंचन क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 1708 हेक्टर व साक्री तालुक्यातील 1948 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
 

Web Title: 'Tapi-Evil' is a barrier to obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.