तापी-नर्मदा खोरे जलविकास आराखडा ही दिशाभूल : मेधा पाटकर यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:56 PM2018-02-01T12:56:14+5:302018-02-01T12:56:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सरदार सरोवर प्रकल्पात किती पाणी आह़े याची माहिती शासनाला नाही, नर्मदा व तापी खोरे विकास जलआराखडा तयार करून आदिवासी बाधवांसह सर्वाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आह़े याला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत सामाजिक कार्यकत्र्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केल़े
शहाद्यातील लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये जलसंपदा विभाग, तापी पाटबंधारे विभाग जळगाव, पाटबंधारे प्रकल्प धुळे आणि नर्मदा विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा खो:याचा एकात्मिक जल आराखडा मसुद्याबाबत लाभार्थी कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत लाभार्थीसह नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, माजीमंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, तापी खोरे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता डी़डी़जोशी, सहायक अभियंता संदीप भालेराव, उपकार्यकारी अभियंता ज़ेएऩसोनीस, सरदार सरोवरचे अप्पर जिल्हाधिकारी बी़एस़बोराडे, नूरजी पाडवी, मांगल्या पावरा, पुन्या वसावे, लालसिंग वसावे, लतिका राजपूत, विजय वळवी, ओरसिंग पटले, सियाराम पाडवी, अनिल कुवर, सुकदेव पावरा, जि़प़ सदस्य रतन पाडवी, माजी सभापती सी़क़ेपाडवी, केवलसिंग वसावे, निशा वळवी उपस्थित होत़े
पुढे बोलताना पाटकर म्हणाल्या की, नर्मदा व तापी खोरे विकासाचा आराखडा मंजूर करून घेण्यासाठी ही कार्यशाळा आह़े मात्र शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडू, शासनाने किती बोगदे तयार करून नर्मदेचे पाणी तापीत आणण्याचे नियोजन आह़े हे जनतेसमोर आणाव़े 36 गावे बोगद्याच्या मार्गात आहेत़ त्यापैकी 33 गावांचे सव्रेक्षण झाले आह़े आदिवासी गाव-पाडय़ांवर वापर करत असलेल्या नदी नाल्यांचा समावेश केलेला नाही़
माजीमंत्री वळवी म्हणाले की, नर्मदा बोगद्यातून 30 हजार क्सूसेस पाणी देऊ अशी आश्वासने देऊ नये, आदिवासी समाजाला विस्थापित करू नका, स्थलांतर व बेरोजगारी यातून समाज मुख्य प्रवाहापासून दूर गेला आह़े