आॅफलाईन बदल्यांना शिक्षक परिषदेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:48 PM2020-07-20T13:48:54+5:302020-07-20T13:49:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाइन प्रकियेद्वारे करुन बदल्यांमागे होणारी आर्थिक ...

Teacher council opposes offline transfers | आॅफलाईन बदल्यांना शिक्षक परिषदेचा विरोध

आॅफलाईन बदल्यांना शिक्षक परिषदेचा विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाइन प्रकियेद्वारे करुन बदल्यांमागे होणारी आर्थिक देवाण-घेवाण रोखली होती. परंतु सद्यस्थितीत जिल्हाअंतर्गत बदल्या या आॅफलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्टÑ शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे तर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे. राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरूषोत्तम वसंत काळे, राज्यकार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने १५ जुलै रोजी आदेश काढून राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी आॅफलाईन पद्धतीने कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.
परंतु आॅफलाईन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाईन पद्धतीनेच होणे गरजेचे असल्याबाबत लेखी निवेदनाद्वारे शासनास अवगत करण्यात आल्याची माहिती आमदार रावल यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. आॅनलाईन जिल्हांतर्गत बदल्या करत असताना २०१८-१९ व सन २०१९-२० च्या बदल्यांमध्ये रॅण्डम राऊंडमध्ये व विस्थापित बदल्यांमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना आॅनलाईन बदल्यात विना अट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी.
तसेच महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करुन निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती.
समितीच्या अहवालानुसार नवीन बदली धोरण जाहीर करुन बदल्या करणे अपेक्षित असताना सध्या कोविड-१९ चा संसर्ग वाढलेला असताना आॅफलाईन बदल्या करण्याचा घाट घालणे चुकीचे आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणातील त्रुटी दूर करुन आॅनलाइन पद्धतीनेच बदल्या करण्यात याव्यात.
देशातील व राज्यातील कोविड-१९ व लॉकडाऊनचा काळ विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या विशेषत: नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागातील संदर्भासाठी आॅनलाइन पद्धतीने करण्याबाबतचा आग्रह लेखी निवेदनात आ.जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

Web Title: Teacher council opposes offline transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.