मदतीचा धनादेश स्वीकारताना अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:44 AM2020-01-27T11:44:55+5:302020-01-27T11:45:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ...

Tears of relief when accepting help checks | मदतीचा धनादेश स्वीकारताना अश्रू अनावर

मदतीचा धनादेश स्वीकारताना अश्रू अनावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले. दरम्यान, निवडणुकीच्या ड्युटीवर असतांना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांना मदतीचा धनादेश देतांना त्यांच्या कुटूंबियांना अश्रू अनावर झाले. यावेळी अवघे सभागृहाने देखील हळहळ व्यक्त केली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीर येथे आयोजित दहाव्यया राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम आदी उपस्थित होते. दुर्गम भागातील मतदान केंद्रात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कर्तव्यभावनेने त्यांनी चांगली कामगिरी बजावल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला असून इतर केंद्रस्तरीय अधिकाºयांनीदेखील भविष्यात अशीच कामगिरी करावी. यापुढील प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक गावातून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न झाला पाहिजे असे आवाहन डॉ.भारुड यांनी केले.
मान्यवरांच्या हस्ते मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चांगली कामगिरी करणाºया केंद्रस्तरीय अधिकाºयांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदार नोंदणीचा संदेश दिला. तर लायन्स क्लबच्या सदस्यांनी मतदान नोंदणीचे आवाहन करणारे गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विविध शाळांचे विद्यार्थी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिक्षक व नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली. विधानसभा निवडणूकीत अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा मतदान केंद्रावर कार्यरत असताना दुदैर्वी मृत्यु आलेले शिक्षक किसन लालसिंग नाईक यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेला १५ लाख रुपयांचा धनादेश डॉ.भारुड यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

Web Title: Tears of relief when accepting help checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.