तहसीलदार कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:27 PM2020-07-22T12:27:53+5:302020-07-22T12:28:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाशी लढा देऊन मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून घरी परतलेल्या येथील कोरोना योद्धा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी ...

Tehsildar Coronamukta | तहसीलदार कोरोनामुक्त

तहसीलदार कोरोनामुक्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाशी लढा देऊन मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून घरी परतलेल्या येथील कोरोना योद्धा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचे निवासस्थान असलेल्या शंकरविहार वसाहतीत त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
शंकरविहार सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील, दशरथ पाटील, सचिन पाटील, प्रमिला विठ्ठल पाटील, मंडळ अधिकारी अमृतकर, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांच्यावर प्रवेशद्वारापासून तर निवासस्थानापर्यंत पुष्पवृष्टी करुन स्वागत करण्यात आले. शहरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या तीन महिन्यापासून प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासोबत तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी हे जनजागृती करीतआहेत. पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने धडपड करीत गल्लीबोळात फिरून फवारणीपासून तर स्वच्छतेपर्यंत लक्ष केंद्रीत करीत आहे. विविध सेवाभावी संस्था व संघटनांतर्फेही तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर ते स्वत: उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. आठ दिवस उपचार झाल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्यावर त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले.

Web Title: Tehsildar Coronamukta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.