दुर्गम भागात दूरसंचारची मोबाईल सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:57 PM2019-08-04T13:57:38+5:302019-08-04T13:57:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिकांना सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा शुक्रवार दुपारपासून बंद ...

Telecommunication services in remote areas turned off | दुर्गम भागात दूरसंचारची मोबाईल सेवा बंद

दुर्गम भागात दूरसंचारची मोबाईल सेवा बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुडय़ाच्या दुर्गम भागातील नागरिकांना सर्वाधिक सहाय्यकारी ठरणारी दूरसंचार विभागाची मोबाईल सेवा शुक्रवार दुपारपासून बंद आह़े दूरसंचार विभागाने टावरसाठी घेतलेल्या वीजेचे बिल न दिल्याने कंपनीने वीज कनेक्शन कापल्याने ही स्थिती उद्भवली आह़े 
दूरसंचार विभागाकडे वीज वितरण कंपनीचे साधारण साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल थकीत होत़े त्यांच्याकडून विभागाला नोटीसा देण्यात आल्या होत्या़ कंपनी आणि दूरसंचार विभाग यांच्यात चर्चा झाल्यानंतर मुदतवाढ देऊन निपटारा केला गेला होता़ परंतू मुदतवाढ देऊनही दूरसंचार विभागाने तालुक्यात उभारलेल्या आठ टावरचे विजबिल न भरल्याने शुक्रवारी वीज कनेक्शन कापण्यात आल़े यामुळे टावर बंद पडून साधारण 60 हजार नागरिकांची मोबाईल सेवा आणि विविध बँका, मिनी बँका व शासकीय कार्यालयातील इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद होऊन व्यवहार ठप्प झाल़े याबाबत ग्राहकांना अधिकृत माहिती नसल्याने त्यांच्याकडून शासकीय कार्यालयात चौकशा सुरु होत्या़ परंतू दूरसंचारची वीज कापली गेल्याची माहिती मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली़ दूरसंचार बंद झाल्याने धडगाव आणि तोरणमाळ येथील सर्वच व्यवहार बंद झाले होत़े धडगाव येथील स्टेट बँकेसह इतर राष्ट्रीयकृत बँक आणि मिनीबँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती़ सेतू केंद्रासह तलाठींकडून मिळणारे विविध ऑनलाईन दाखल्यांसाठी नागरिकांची फिरफिर होत होती़ 
वीज कनेक्शन कापलेल्या दूरसंचार विभागाच्या मोबाईल टावरचे सहा महिन्यांपासून वीज बिल भरण्यात आलेले नसल्याची माहिती समोर येत आह़े सोमवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आह़े 

धडगाव कार्यालयाचे तीन लाख रुपये विजबिल थकले 
दूरसंचार विभागाच्या धडगाव येथील मुख्य कार्यालयाचे वीज बिल हे तीन लाख रुपये असल्याने वीज जोडणी कापण्यात आल्याची माहिती आह़े दुसरीकडे तोरणमाळ येथील टावरचे 15 हजार 20, घाटली 7 हजार, कात्री 30 हजार 40, सुरवाणी 15 हजार 300, सिसा 20 हजार 556 तर खुंटामोडी येथील दूरसंचार विभागाच्या टावरचे वीजबिल 24 हजार 70 रुपये होत़े हे बिल न भरले गेल्याने त्यांचा वीज पुरवठा बंद करण्याची कारवाई शुक्रवारी दिवसभरात पूर्ण करण्यात आली़ शनिवारी या भागात अनेकांचे मोबाईल बंद होत़े
 

Web Title: Telecommunication services in remote areas turned off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.