दुसऱ्या दिवशीही नंदुरबारात तापमान ४० अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:42 AM2019-03-27T11:42:35+5:302019-03-27T11:42:50+5:30
नंदुरबार : नंदुरबारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कमाल तापमान ४० अंशावर कायम राहिले होते़ वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात ...
नंदुरबार : नंदुरबारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही कमाल तापमान ४० अंशावर कायम राहिले होते़ वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागत आहे़
गेल्या काही दिवसांपासून उष्ण व कोरडे हवामान असल्याने वातावरणात कमालीची उष्णता निर्माण झालेली आहे़ वाढत्या तापमानामुळे दैनंदिन कामावर याचा परिणाम होताना दिसून ेयेत आहे़ उष्ण लहरींमुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ नंदुरबारचे तापमान ४० अंशावर स्थिर असल्याने लहान बालके व वयोवृध्दांवर याचा सर्वाधिक दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे़
दुपारच्या वेळी उन्हाच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत आहेत़ वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणेही अवघड होत असल्याने सकाळी व सायंकाळी शेतीची कामे करण्याकडे शेतकºयांचा कल दिसून येत आहे़ मार्चअखेरीमध्येच तापमान चाळीशी पार झालेले असल्याने येत्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे़