जिल्ह्यातील दहा फौजदार झाले पुन्हा जमादार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:12 PM2018-03-23T12:12:39+5:302018-03-23T12:12:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस दलाने तात्पुरत्या स्वरूपात फौजदारपदी पदोन्नती दिलेल्या दहा जणांना पुन्हा मुळ पदावर अर्थात जमादार पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ातच हे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.
पोलीस दलाने राज्यभरातील एक हजार 515 जमादार पदाच्या कर्मचा:यांना पोलीस उपनिरिक्षक म्हणून बढती दिली होती. त्यानुसार असे कर्मचारी फौजदार पदावर कार्यरत देखील झाले होते. परंतु काही कर्मचारी मॅटमध्ये गेल्याने मॅटच्या निर्णयानुसार अशा पदोन्नती झालेल्या कर्मचा:यांना तात्काळ मुळ पदावर पदस्थापना देण्याचे सुचीत केले होते. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये त्याबद्दल लागलीच कार्यवाही करण्यात आली. गेल्या आठवडय़ातच संबधितांना मुळ पदाची आस्थापना देण्यात आली.
नंदुरबार पोलीस दलातील दहा जणांना अर्थात जमादार पदावर असलेल्यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाली होती. पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हा शाखा, विशेष शाखा आणि काही पोलीस ठाण्यांमध्ये अशा अधिका:यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अशा ठिकाणच्या जागांवर आता समायोजन करावे लागणार आहे.