सणासुदीमुळे परिवहन विभागावर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:46 PM2018-11-01T12:46:51+5:302018-11-01T12:46:59+5:30
गरजेनुसार जादा बसेस्चे नियोजन : भाडेवाढीचा प्रवासी संख्येवर परिणाम नाही
नंदुरबार : सध्या सुणासुदीनिमित्त परिवहन महामंडळावर ताण जाणवत आह़े 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, एसटीची हंगामी भाडेवाढ करण्यात आली आह़े परंतु याचा परिणाम प्रवासी संख्येवर झालेला दिसत नाही़ लांब पल्यांच्या बसेस्मध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आह़े
दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून नंदुरबार आगाराकडून सकाळी 8 वाजता नंदुरबार-अमदाबाद बस सुरु करण्यात येत आह़े तसेच दुपारी 12 वाजता वापी मार्गे नंदुरबार-बोरिवली ही नवीन बस सुरु करण्यात आली आह़े वाढत्या प्रवासी संख्येमुळे गरजेनुसार विविध मार्गावरील बसफे:या वाढविण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी सांगितल़े
दरम्यान, एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आह़े प्रमुख मार्गावरील भाडेवाढ पुढील प्रमाणे - नंदुरबार-मुंबई (दिवसा) सर्वसाधारण भाडे 500 रुपये भाडेवाढीनंतर 560 रुपये तर रातराणी बसचे सर्वसाधारण भाडे 600 रुपये व भाडेवाढीनंतर 660 रुपये, नंदुरबार-पुणे (दिवसा) सर्वसाधारण 535 रुपये, भाडेवाढीनंतर 590 रुपये तर रातराणीचे सर्वसाधारण 635 रुपये, भाडेवाढीनंतर 700 रुपये, नंदुरबार-नाशिक (दिवसा) सर्वसाधारण 275 रुपये, भाडवाढीनंतर 305 रुपये, रातराणीचे 325 रुपये, भाडेवाढीनंतर 360 रुपये, नंदुरबार-औरंगाबाद सर्वसाधारण 315 रुपये तर भाडेवाढीनंतर 345 रुपये, नंदुरबार-मालेगाव 210 रुपये भाडेवाढीनंतर 235 रुपये, नंदुरबार-पंढरपूर (दिवसा) सर्वसाधारण 675 रुपये, भाडेवाढीनंतर 725 रुपये, रातराणीचे 775 रुपये, भाडेवाढीनंतर 855 रुपये, नंदुरबार-कल्याण (रातराणी) सर्वसाधारण 610 रुपये, भाडेवाढीनंतर 670 रुपय़े
दरम्यान, नंदुरबार येथून नाशिक व पुणे मार्गावर शिवशाही बस सोडण्यात येत आहेत़ नंदुरबार-नाशिक (दिवसा) सर्वसाधारण 410 रुपये, भाडेवाढीनंतर 450 रुपये, नंदुरबार-पुणे (शयन) सर्वसाधारण भाडे 1 हजार 145 रुपये असून यात कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही़ नंदुरबार-पुणे (सिटींग) 820 रुपये, भाडेवाढीनंतर 900 रुपय़े
महसूली उत्पन्नात होणार वाढ
दसरा, दिवाळी, पाडवा, भाऊबीज आदी सणांच्या कालावधीत वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत असतो़ सध्या दिवाळीनिमित्त प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणात आप्तेष्टांकडे प्रवास करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच एसटी महामंडळावरही याचा ताण जाणवत आह़े त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पाश्र्वभूमिवर एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली असल्याने साहजिकच यातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आह़े
महामंडळाकडून दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली असली तरी याचा प्रवासी संख्येवर कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आह़े तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात येत आह़े ज्या मार्गावर मागणी असेल तेथे जादा बसेस सोडण्यात येणार आह़े तसेच दैनंदिन मुंबई बस कायम ठेवून 1 नोव्हेंबरपासून नंदुरबार-बोरवली ही नवीन बस सुरु करण्यात आली आह़े वापीमार्गे असलेली ही बस दुपारी 12 वाजता नंदुरबार येथून निघणार आहेत़