डीबीटी योजनेला फाटा देत कापड पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:30 AM2017-08-13T11:30:04+5:302017-08-13T11:30:04+5:30
विद्यार्थी गणवेश वाटप : तळोदा आदिवासी प्रकल्पातील प्रकार; चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शासनाच्या शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्याथ्र्याना गणवेश अथवा इतर साहित्य देताना ते प्रत्यक्ष पुरविण्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यावर रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला असताना हा निर्णय धाब्यावर बसवत तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांवर ठेकेदारांनी जून महिन्यातच गणवेशाचे कापड पुरविल्याचा प्रकार समोर आला आहे.
गणवेशाअभावी कापडांचे गाठोडे देखील तसेच धूळखात पडले आहे. शासनाच्या अशा धोरणाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, विद्याथ्र्याना तातडीने गणवेश देण्यात यावा, अशी पालकांची अपेक्षा आहे.
शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी मुला-मुलींसाठी संपूर्ण राज्यात साधारण 552 निवासी शासकीय आश्रमशाळा 28 प्रकल्पांमार्फत गणवेश, रेणकोट, शैक्षणिक व इतर साहित्य पुरविले जाते. हे साहित्य ठेकेदारांमार्फत पुरविले जात होते. तथापि अतिशय निकृष्ठ दर्जाचे पुरविले जात असल्याने पालकांकडून शासनाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत होत्या. या पाश्र्वभूमिवर शासनाने ऑक्टोंबर 2016 मध्ये आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना कोणत्या वस्तुंचा लाभ, वस्तु स्वरूपात न देता त्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर देण्याचा निर्णय म्हणजे डी.बी.टी. योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे असताना आदिवासी विकास विभागाने ठेकेदारांमार्फत जून महिन्यातच तळोदा तालुक्यातील बहुतेक आश्रम शाळांवर गणवेशाचे कापड पुरविले असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
वास्तविक रोख रक्कम विद्याथ्र्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय झालेला असताना आदिवासी विकास विभागाने त्यास हरसाळ फासला आहे. शाळांवर कापड पाठवून जवळपास दीड-दोन महिने झाले आहे. परंतु कापडाचे हे गाठोडे अक्षरश: धुळखात पडले आहे. या प्रकरणी वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, यासंदर्भात तळोदा प्रकल्पातील एका अधिका:याने नाव न सांगण्याच्या अटीवर गणवेश शिलाईची निविदा काढण्यात आल्याचे सांगितले.