तूरला साडेपाच हजार क्विंटल भाव : नंदुरबारात आधारभूत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:24 PM2018-02-10T12:24:19+5:302018-02-10T12:24:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नाफेडअंतर्गत आधारभूत किंमतीत तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये भाव देण्यात आला आहे.
नंदुरबारात एमएसपी च्या केंद्राच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेडअंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाय.एस.पूरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन भरतभाई पाटील, संचालक किशोर पाटील, मार्केटींग फेडरेशनचे सुनील देशमुख, शेतकरी संघाचे मॅनेजर कृष्णा पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर, संघाचे ग्रेडर भाऊराव बोरसे, नाफेडचे ग्रेडर महेश वसावे, गिरीष पाटील, आनंदराव पाटील, चंद्रकांत मराठे, युवराज पाटील, चंद्रकांत पाटील, विरेंद्र पवार व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
केंद्राने निश्चित केलेल्या आधारभूत दर प्रतीक्विंटल पाच हजार 450 रुपये निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी मालाची आद्रता 12 टक्के एवढी पाहिजे. तूर विक्रीसाठी आणतांना सातबारा उतारा, आधारकार्ड, बँकचे पासबूक आदी कागदपत्रे शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक आहे. नवापूर व अक्कलकुवा तालुका हे नंदुरबार केंद्राला जोडण्यात आले असून त्या भागातील शेतक:यांनी याची दखल घ्यावी असेही आवाहन शेतकरी सहकारी संघातर्फे करण्यात आले आहे.