बिबट्याच्या हल्ल्यात बालक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:25 PM2022-07-19T17:25:27+5:302022-07-19T17:26:05+5:30

लकी विरसींग पाडवी वय (३ वर्षे) असे मयत बालकाचे नाव आहे.

The child was killed on the spot in the leopard attack in Nandurbar | बिबट्याच्या हल्ल्यात बालक जागीच ठार

बिबट्याच्या हल्ल्यात बालक जागीच ठार

googlenewsNext

नंदुरबार : गुराखीकडे आपली गुरे नेणाऱ्या आईच्या पाठीमागे गेलेल्या तीन वर्षीय बालकावर बिबट्याने पाठीमागून हल्ला चढवून बालकाच्या मानेवर चावा घेतल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सरदार नगर वसाहतीत घडली. 

लकी विरसींग पाडवी वय (३ वर्षे) असे मयत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील सरदार नगर येथील पारताबाई विरसिंग पाडवी ही महिला मंगळवारी सकाळी नऊ वाजेचा सुमारास आपली गुरे गुरख्याकडे घेवून जात होती. त्याच वेळी तिचा बालक लकी हा आपल्या आईच्या पाठीमागे जात होता. गावापासून शंभर मीटर पुढे गेल्यावर आईने त्याला तिथेच थांबायला सांगितले.  तो थांबला असता त्याचवेळी बिबट्याने पाठीमागून त्याच्यावर झडप घातली. 

बालकाच्या मानेवर जोरदार प्रहार करत बिबट्याने चावा घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आईने ते दृश्य पहिल्या बरोबर आरडा,ओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. ही घटना गावात कळाल्यानंतर गावकरी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटना कळविली. याबाबत तळोदा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The child was killed on the spot in the leopard attack in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.