वीज मीटर बदल मोहिमेतून उघडकीस आले वीज चोरीचे गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:31 AM2019-10-17T11:31:52+5:302019-10-17T11:31:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज वितरण कंपनीने गेल्या चार महिन्यांपासून वीज मीटर बदलाचे काम हाती घेतले आह़े यातून ...

Theft of electricity theft revealed from a change of electricity meter | वीज मीटर बदल मोहिमेतून उघडकीस आले वीज चोरीचे गुन्हे

वीज मीटर बदल मोहिमेतून उघडकीस आले वीज चोरीचे गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज वितरण कंपनीने गेल्या चार महिन्यांपासून वीज मीटर बदलाचे काम हाती घेतले आह़े यातून वीज चोरीचे गुन्हे उघडकीस येऊ लागले असून यामुळे वीज चोरटय़ांचे धाबे दणाणले आह़े जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात तब्बल 752 जणांवर वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आह़े  
महावितरणने खान्देशातील 14 शहरांमध्ये वीज मीटर बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ यांतर्गत जिल्ह्यात नवापुर, शहादा, तळोदा आणि नंदुरबार या चार शहरांमध्ये प्रत्येक ग्राहकाला नवीन विज मीटर देण्याची तरतूद करण्यात आली होती़ यांतर्गत नंदुरबार आणि शहादा या दोन शहरातील 39 हजार 928 ग्राहकांचे घरगुती वीज मीटर बदलण्याचे काम सुरु आह़े नंदुरबार शहरात 3 हजार 200 मीटर बसवून पूर्ण झाले आहेत़ ग्राहकांनी महिनाभर वापरलेल्या अचूक बिलाचा आकडा घरपोच करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेंसी अर्थात ‘वायफाय’ मीटर देण्याचा हा उपक्रम आह़े यातून ग्राहकांची सोय होईल असा दावा वीज कंपनीचा होता़ परंतू वीज मीटर बदलाच्या या मोहिमेत वीज चो:या उघडकीस येत आहेत़ शहाद्यात गेल्या दोन दिवसात तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत़ तर नंदुरबारात वीज मीटरमध्ये फेरफार करणा:यांचे पितळ उघडे पडले आह़े त्यांच्यावर कंपनीच्या भरारी पथकांनी कारवाई करुन अहवाल तयार करणे सुरु  केले आह़े 
वायफाय तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वीज मीटरमधील वीज वापराचे रिडिंग विज वितरण कंपनीच्या सव्र्हरमध्ये संकलित होऊन कंपनीला वेळेवर वीज बिलांचे वाटप करणे शक्य होणार असल्याची माहिती दिली गेली आह़े 
एकीकडे वीज मीटर बदलाचे वारे वाहत असताना नंदुरबार आणि शहादा शहरात काहींना नाहक कंपनीच्या या मोहिमेतून भुर्दंड बसल्याचे प्रकारही समोर आले आहेत़ यात प्रामुख्याने वीज मीटर बदल होत असताना त्याची तपासणी केल्यावर त्याची हाताळणी करुन त्याची गती कमी केली किंवा कसे याची तपासणी कंपनीकडून होत आह़े मात्र काही ग्राहकांना दिलेले मीटर हे पूर्वीपासून खराब असल्याचे सांगण्यात येत आह़े याबाबत काहींनी रितसर कंपनीकडे तक्रारीही केल्या होत्या़ परंतू कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत आह़े ही प्रकरणे अपवादात्मक असली तरी कंपनीकडून दक्षता घेण्याची मागणी आह़े 

वीज वितरण कंपनीच्या विविध भरारी पथकांनी शहादा, नंदुरबार, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, नवापुर, विसरवाडी, खापर, शहादा, सारंगखेडा, म्हसावद, मोलगी, बोरद यासह विविध गावांमध्ये 2018-19 या वर्षात वीज चोरीचे 752 प्रकरणे उघडकीस आणले होत़े त्यापोटी दोषी वीज ग्राहकाला 98 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता़ यात 252 ग्राहकांनी वीज कंपनीसोबत तडजोड करुन रक्कम भरल्यानंतर त्यांना कंपनीकडून नाहरकत देण्यात आली होती़ 252 ग्राहकांनी एकूण 43 लाख रुपयांचा दंड भरुन दिल्याची माहिती देण्यात आली आह़े उर्वरित 500 वीज ग्राहकांकडून 55 लाख रुपयांच्या वसुलीसाठी कारवाई सुरु असून त्यातील काहींच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी वीज कंपनीकडून त्या-त्या पोलीस ठाण्यांना पत्र देण्यात आले आह़े 

दरम्यान शहादा शहरात वीज चोरी करणा:या दोघांविरोधात वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई करत शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आह़े दोघांनी 58 हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे समोर आले होत़े जळगाव वीज वितरण कंपनीचे हेमंत यशवंत थोतरे यांनी शहरातील चुडामण रतन भोई आणि अशोक आत्माराम पाटील यांच्याकडे छापा टाकला होता़ 24 सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईत याठिकाणी लावलेल्या वीज मीटरमध्ये फेरफार झाल्याचे दिसून आले होत़े तब्बल 24 महिन्यापासून हा प्रकार सुरु असल्याचे पथकाने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आह़े  यातून 58 हजार 960 रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले होत़े पथकाने अहवाल तयार केल्यानंतर शहादा पोलीस ठाण्यात भरारी पथक प्रमुख हेमंत थोतरे यांच्या फिर्यादीवरुन चुडामण भोई व अशोक पाटील या दोघांविरोधात वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Theft of electricity theft revealed from a change of electricity meter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.