अनरद येथे आगीत चार घरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:56 PM2017-11-02T12:56:08+5:302017-11-02T12:56:08+5:30
रॉकेल दिव्याचा भडका : महिला गंभीर जखमी, कापसाचेही नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : पेटत्या दिव्यात रॉकेल ओतत असतांना अचानक दिव्याचा भडका होऊन लागलेल्या आगीत अनरद येथे चार घरे जळून खाक झाली. आगीत महिला गंभीर भाजली आहे. सारंगखेडा पोलिसात रात्री उशीरार्पयत अगिA उपद्रवाची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अनरद, ता.शहादा येथील विजय ताराचंद खैरनार यांच्या प}ी कोकिळाबाई विजय खैरनार या बुधवारी सायंकाळी सहा वाजता रॉकेल्या पेटत्या दिव्यात रॉकेल ओतत होत्या. त्यावेळी अचानक दिव्याने पेट घेत त्याचा भडका उडाला. परिणामी दिवा त्यांच्या हातून निसटून खाली पडला. लगतच कापूस भरून ठेवलेला असल्यामुळे लागलीच कापसाने देखील पेट घेतला. क्षणार्धात हे सर्व घडल्याने कोकिळाबाई यांना बाहेर पडता आले नाही. परिणामी त्या देखील गंभीर भाजल्या. आगीने लागलीच रौद्ररूप धारण केले. परिणामी संपुर्ण घर खाक झाले. या घराच्या बाजुलाच असलेले पांडू लोटन महाजन, यादव नथ्थू महाजन व राजेंद्र गुलाबराव देवरे यांचे घर देखील जळून खाक झाले.
या सर्वच घरात नुकताच काढणी केलेला कापूस भरून ठेवलेला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. लाखो रुपयांचा कापूस या आगीत खाक झाला.
ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रय} केला. शहादा व दोंडाईचा येथील दोन बंबांच्या सहाय्याने दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत दहा लाखापेक्षा अधीकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी महिलेला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक मनोहर पगार, फौजदार युवराज सैंदाणे यांनी कर्मचा:यांसह धाव घेतली