नंदुरबार जिल्ह्यातील 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणच नाही
By admin | Published: July 6, 2017 01:01 PM2017-07-06T13:01:02+5:302017-07-06T13:01:02+5:30
आढावा बैठकील उघड झाली माहिती. दोष दुरुस्ती अहवालाकडे दुर्लक्ष
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.6- : जिल्ह्यातील 770 सहकारी संस्थांपैकी केवळ 81 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले आहे. जुलैअखेर लेखापरीक्षण व दोष दुरुस्ती अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षक यांची आढावा बैठक जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस.वाय. पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत 2016-17 मध्ये ठरावानुसार वाटप करण्यात आलेल्या जिल्ह्यातील संस्थांचा आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील एकूण 770 पैकी 81 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असून 689 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण होणे बाकी आहे. जिल्ह्यातील 2015-16 चे दोष दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला असून 770 पैकी 536 सहकारी संस्थांनी दोष दुरुस्ती अहवाल सादर केलेला असून 234 सहकारी संस्थांनी दोष दुरुस्ती अहवाल सादर केलेला नाही. या संस्थांचे दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत वेळोवेळी संबंधिताना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वैधानिक लेखापरीक्षण अहवाल तसेच दोष दुरुस्ती अहवाल कामकाजाचा आढावा उपस्थित असलेल्या खात्याचे सनदी व प्रमाणित लेखापरीक्षक यांच्याकडून घेण्यात आला. या वेळी अडचणी मांडण्यात आल्या. त्यांचे निरसन जिल्हा उपनिबंधकांनी केले. लेखापरीक्षण अहवाल संस्थेस व विशेष लेखापरीक्षक कार्यालयास जुलै अखेर्पयत सादर करण्याच्या सूचना सर्व संबधिताना या वेळी देण्यात आल्या.