जात पडताळणीसाठी मुदतवाढ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:02 PM2019-12-07T12:02:18+5:302019-12-07T12:02:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव अद्याप जमा झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक परिपूर्ण प्रस्ताव १६ डिसेंबरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबत समितीने आवाहन देखील केले आहे.
प्रस्तावासोबत आॅनलाईन भरलेला विहित नमुन्यातील फॉर्म, फोटो व प्राचार्य यांचा दिनांकासह सही शिक्का, जातीचे प्रमाणपत्र मुळ व छायांकित प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, चुलते यांचा शाळा सोडल्याचा दाखला, आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला, पंजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे मुख्याध्यापक/प्राचार्य किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या सहीचे साक्षांकित सादर करावे.
महाराष्ट्रातील वास्तव्याचा जात निहाय मानीव दिनांक अनुसूचित जातीसाठी १० आॅगष्ट १९५०, विमुक्त व भटक्या जमातीसाठी २१ नोव्हेंबर १९६१, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासप्रवगार्साठी १३ आॅक्टोंबर १९६७ या आहेत.
आगामी शैक्षणिक वषार्साठी, अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मागासवगीर्यांच्या राखीव जागेवर प्रवेश घेणाºया किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी अद्याप शैक्षणिक प्रस्ताव सादर केला नसल्यास त्यांनी १६ डिसेंबर २०१९ अखेर परिपूर्ण प्रस्ताव समिती कार्यालयास सादर करावा, असे आवाहन राकेश पाटील उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.