पुरात वाहून गेलेल्या बंधाºयाची दुरुस्ती नाही

By admin | Published: March 15, 2017 12:33 AM2017-03-15T00:33:14+5:302017-03-15T00:33:14+5:30

गोमाईवरील केटीवेअर : १० वर्षांपासून दामळदा परिसरात पाणीटंचाई

There is no repair of damaged bridges | पुरात वाहून गेलेल्या बंधाºयाची दुरुस्ती नाही

पुरात वाहून गेलेल्या बंधाºयाची दुरुस्ती नाही

Next


शहादा : तालुक्यातील दामळदा परिसरातील गोमाई व खापरी नदीवरील केटीवेअर बंधारे २००६ च्या महापुरात वाहून गेल्यानंतर अद्यापही त्या बंधाºयांची दुरुस्ती अथवा नवीन बंधारे न बांधण्यात आल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे लक्ष न घातल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दामळदा परिसरात गोमाई, उमराई व खापरी अशा तीन नद्या असून त्यावर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते. मात्र २००६ मध्ये अतिवृष्टीने या नद्यांना आलेल्या मोठ्या पुरांमध्ये बंधारे वाहून गेले. त्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी व नवीन बंधारे बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकºयांनी केली आहे. परंतु त्यासंदर्भात कुठलीही दखल न घेण्यात आल्याने आज या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शेतीतील विहिरी व कूपनलिकेतील पाण्याची पातळी खोल गेल्याने असंख्य विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारणही बिघडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात दामळदा परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिले आहे. त्यात नवीन बंधारे त्वरित बांधावेत व वाहून गेलेले बंधारे त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
गोमाई नदीवर तापीवरील बॅरेजेसप्रमाणे बॅरेजेस बांधल्यास या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. त्यामुळे यासंदर्भातही शासनाने विचार करून तसे सर्वेक्षण करून बंधारे मंजूर करण्याची मागणी शेतकºयांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)

 

Web Title: There is no repair of damaged bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.