Vidhan Sabha 2019: आदिवासी आरक्षणाला धक्का नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:14 PM2019-10-15T12:14:54+5:302019-10-15T12:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी आमदार-खासदार भाजपाने निवडून आणले आहेत़ असा दावा करुन भाजपच्या राज्यातच ख:या अर्थाने सर्वघटकांना न्याय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टीय कार्याध्यक्ष ज़ेपी़नड्डा यांनी केल़े
शहादा-तळोदा मतदार संघाचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ सोमवारी तळोद्यातील आनंद चौकात विजय संकल्प सभा घेण्यात आली़ त्यावेळी ते बोलत होत़े प्रसंगी राज्याचे प्रभारी व्ही़सतीश, गुजरातचे आमदार ज़ेपी़झडपीया, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ़ शशिकांत वाणी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, रुपसिंग पाडवी, योगेश चौधरी, राजेंद्रकुमार गावीत, राजेंद्र राजपूत, यशवंत पाडवी, जितेंद्र दुबे, प्रकाश कुळकर्णी, जितेंद्र पाडवी, आनंद सोनार, विश्वनाथ कलाल उपस्थित होत़े
पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राज्यात अनेक वर्षे राज्य केलेले असताना पूर्ण पाच वर्षे स्थिती मुख्यमंत्री दिला नाही़ आलटून पालटून नेतृत्त्व दिल़े त्यामुळे भ्रष्टाचारही बोकाळला होता़ मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण पाच वर्षे स्थिर सरकार चालवून राज्याचा विकास घडवून आणला आह़े केंद्रातील मोदी सरकारने काश्मिरातील 370 कलम रद्द करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आह़े यामुळे जम्मू काश्मिरातील नागरिकांना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आह़े तेथे ख:या अर्थाने देशाचे संविधान लागू झाले आह़े मात्र विरोधक सरकारच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत़ काँग्रेसने नेहमीच मतांचे राजकारण करुन दोन धर्मामध्ये भांडणे लावण्याचा उपदव्याप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला़
370 कलम रद्द झाल्याने तेथील आदिवासींना आरक्षणाचा लाभ मिळणार आह़े असे सांगून केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात देशा बरोबरच राज्यातही अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत़ शेतकरी सन्मान योजनेत कोटय़ावधी शेतक:यांना थेट लाभ मिळाला़ याशिवाय पेन्शन योजना लागू झाली़ पिकांना देखील हमीभाव दिला़ देशातील 10 कोटी 60 लाख लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सरकारला बदनाम करत आह़े विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वातील महायुतीच्या सरकारला भक्कम साथ द्या असे आवाहन त्यांनी केल़े
यावेळी उमेदवार राजेश पाडवी यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडून मतदारसंघाच्या विकासाकरीता काय, कामे करणार याबाबतची माहिती सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली़ प्रास्ताविक पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केल़े सूत्रसंचालन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ शशीकांत वाणी, प्रा़ अविनाश मराठे यांनी केल़े