तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 08:22 PM2019-04-21T20:22:41+5:302019-04-21T20:22:47+5:30

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा ...

There is no water in the Taloda taluka but it is not possible to dig water 500 feet | तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

Next

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात ‘रिबोरींग’ करण्यात येत आहे़ तरीदेखील पाणी लागत नसल्याची स्थिती आहे़
अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत कुपनलिका खोदूनह पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ रिबोरींगचा खर्च तर होतोच परंतु पाणी लागत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे़ पाण्याअभावी परिणामी बहुतेक शेतकºयांची पीक वाया जाण्याच्या स्थिती आहेत़ पाणी लागेल या अपेक्षेने अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करीत शेतात ठिकठिकाणी नवीन बोर टाकून पाण्याचा शोध घेत आहेत.
मात्र तरीही पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.शेतीसाठी तळोदा तालुक्यातील भौगोलिक अनुकूलता संपूर्ण जिल्हयात प्रसिद्ध आहे़ मात्र यंदा मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे साहजिकच भर पावसाळ्यातदेखील येथील शेतकºयांना पाण्याची विवंचना सहन करावी लागली होती़ आता उन्हाळ्यात तर दिवसेंदिवस पाण्याचा स्तर खालावत आहे़ भूजल पातळी एक ते दीड मीटरने खोल गेली आहे़ त्यामुळे परिणामी परिरातील विहिरी व कुपनलिका निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़
पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत आहे. येथे सुपीक जमिनीचा पट्टा व बारमाही पाण्याची मुबलक उपलब्धता असते. परंतु यंदा पावसाअभावी शेतीसाठी मोठे संकट निर्माण झालेले आहे़
पाण्याअभावी पिक करपत आहेत़ त्यामुळे येथील शेती उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत.त्यामुळे पुढील मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची परिस्थिती आहे. येथील परिसरात दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाण्याचे अधिक दुर्भिक्ष जाणवत आहे.
पाण्यासोबत पशुपालकांना चाºयाची समस्याही भेडसावत आहे़ परिसरात पाणीटंचाईमुळे हिरव्या चाºयाची कमतरता निर्माण झालेली आहे़ यामुळे चाºयासाठी अनेक पशुपालकांनी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ मे-जूनपर्यंत ही समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे़

Web Title: There is no water in the Taloda taluka but it is not possible to dig water 500 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.