आश्रमशाळा सुरू करतांना हलगर्जीपणा होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:40 PM2020-11-28T12:40:42+5:302020-11-28T12:40:52+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ...
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आश्रमशाळा सुरू करतांना कोरोनाची आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आदिवासी दुर्गम भागाने कोरोनाला थोपवून ठेवले आहे. आश्रमशाळांचे निमित्त तेथे कोरोनाचा शिरकाव करण्यास होऊ नये अशी अपेक्षा आदिवासी डॅाक्टर असोसिएशनतर्फे अध्यक्ष डॅा.राजेश वळवी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या संक्रमण सुरू असतांना आश्रमशाळाही सुरू होत आहेत. जिल्हयातील गरीब आदिवासी समाजाची मुलेच हया आश्रमशाळेत शिकत आहेत. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर योग्य खबरदारी घेतली नाही तर हा आजार खेडयापाडयात पसरायला वेळ लागणार नाही. कारण सर्व शाळा सुरु होण्याआधी करण्यात आलेल्या तपासणीत अनेक शिक्षक हे पॉझिटिव्ह आले आहेत.
सर्व प्रकारच्या आश्रम शाळेत सरकारने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे व जो हलगर्जिपणा करत असेल त्यास कठोर शिक्षा व्हावी. आश्रम शाळेत मुलांसाठी व शाळेत काम करणा-या सर्वांसाठी मास्क, सॅनिटाझर, हॅडवॉश सारखे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात व जोपर्यंत लसिकरण होत नाही तोपर्यंत उपलब्ध करुन द्यावे.
सर्व आश्रमशाळेत काम करणा-या सर्व स्टाफची कोरोना तपासणी दर १५ दिवसांनी करण्यात यावी. शाळा व वस्तीगृह नियमितपणे व वारंवार निर्जतुकीकरण करावे. एखादा विद्यार्थी आजारी पडल्यास परस्पर घरी पाठविण्यात येऊ नये. हया सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन करुन त्यात प्रामुख्याने पालक, समुदाय / मानसेवी वैद्यकिय अधिकारी, एएनएम, आशा व सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी नेमावे. शासनाने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे अशा परीस्थितीत योग्य वेळेवर व वैद्यकिय तज्ञांच्या सल्ल्याने शाळा बंद करण्यात याव्या. हयासर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास आपण नक्किच कोरानाला दुर राखण्यात यशस्वी होऊ व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकनासही होणार नाही. अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.