तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थी पत्रव्यवहार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:31 AM2019-07-11T11:31:48+5:302019-07-11T11:31:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब यांच्या उपस्थितीत शालेय ...

There will be student correspondence for tobacco embezzlement | तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थी पत्रव्यवहार करणार

तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थी पत्रव्यवहार करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब यांच्या उपस्थितीत शालेय विद्याथ्र्यानी तंबाखूमुक्तीचा संकल्प  केला. या वेळी येथील डी.आर. हायस्कूलच्या  एक  हजार विद्याथ्र्यानी तंबाखूमुक्तीसाठी पत्रव्यवहार उपक्रम राबविण्याचे जाहीर केले.
शालेय विद्याथ्र्यामध्ये तंबाखू सेवनाचे प्रकार वाढू लागल्याने भविष्यात दुष्परिणाम होणार आहेत. त्यासाठी नंदुरबार येथील प्रजापिता ब्रrाकुमारी पाठशाला आणि माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब जनप्रबोधनासाठी जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियान राबवत आहेत. या अभियानाअंतर्गत येथील डी.आर. हायस्कूल येथे प्रबोधन शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.परब यांनी विद्याथ्र्याशी हसत-खेळत मुक्त संवाद साधला. शहरी तथा ग्रामीण भागातील विद्याथ्र्याना आपल्या कुटुंबातील व नातेवाईकांना तसेच परिसरातील नागरिकांना तंबाखू, विडी, सिगारेट यासारख्या पदार्थापासून परावृत्त करीत आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समुपदेशन करणार आहेत. त्यानुसार डी.आर. हायस्कूलच्या एक हजार विद्याथ्र्यातर्फे लवकरच तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत पत्रव्यवहार उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
कार्यक्रमास नंदुरबार येथील प्रजापिता ब्रrाकुमारी विद्यालयाच्या केंद्रप्रमुख बी.के. विजया दीदी, नंदुरबार जिल्हा मीडिया विंग समन्वयक महादू हिरणवाळे, बी.के. वर्षा दीदी, बी.के. राधा दीदी, नंदुरबार व शहादा केंद्रातील सेवेकरी, डी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक  प्रकाश पिंपळे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. आभार पंकज पाठक यांनी मानले.

Web Title: There will be student correspondence for tobacco embezzlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.