चोरट्यांनी व्यापाऱ्याचा गळा केसांनी कापला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:05 PM2020-01-05T13:05:06+5:302020-01-05T13:05:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पटेलवाडी भागात व्यावसायिकाने साठा करुन ठेवलेले महिलांचे सहा लाख रुपयांचे ‘केस’ चोरीला गेल्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील पटेलवाडी भागात व्यावसायिकाने साठा करुन ठेवलेले महिलांचे सहा लाख रुपयांचे ‘केस’ चोरीला गेल्याची घटना २ जानेवारी रोजी उजेडात आली़ गोडावून फोडून चोरट्यांनी ही चोरी केल्याची माहिती आहे़
शहरातील सलीम जुम्मा खाटीक यांचा भांडे विक्रीचा व्यवसाय आहे़ महिलांनी साठा करुन ठेवलेले डोक्याचे केस घेऊन त्या बदल्यात ते भांडी देतात़ यातून त्यांनी सहा लाख रुपये किमतीचे १५० किलो केस पटेलवाडीतील प्लॉट क्रमांक ८८ मध्ये असलेल्या गोदामात साठवून ठेवले होते़ विंचरुन ठेवलेले हे केस १ ते २ जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना दिसून आले़ गोडावूनमधून केसांसह ५० हजार रुपयांची स्टीलची ताटेही चोरीला गेल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत सलीम खाटीक यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार करत आहेत़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस उपअधिक्षक रमेश पवार व पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली़