चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 12:04 PM2019-12-06T12:04:43+5:302019-12-06T12:04:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल ...

Thieves march to white gold now | चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. उत्पन्न निम्म्यावर आले आहे. असे असतांना आता शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. वेचनीवर आलेला कापूस शेतातूनच रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचा प्रकार नंदुरबार व शहादा तालुक्यात वाढला आहे. सहा ते सात घटनांमध्ये दीड ते दोन लाखांचा कापूस आतापर्यंत चोरीस गेला आहे.
यंदा कापूस आणि कांद्याला बºयापैकी भाव मिळत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा या दोन्ही पिकांची उत्पादकता निम्म्यावर घटली आहे. त्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. ज्या शेतकºयांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना बºयापैकी भाव मिळत आहे. असे असतांना आता चोरट्यांच्या धुमाकुळमुळे शेतकºयांच्या हाती येणारे उत्पन्न देखील हिरावले जात असल्याचे चित्र सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात दिसून येत आहे.
खरीपाचे सर्वाधीक क्षेत्र
यंदाही खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे होते. एक लाखापेक्षा अधीक हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अती पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले. यामुळे उत्पादकता निम्म्यावर घसरली. वेचणीची वेळ आल्यावर अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळेही कापूस खराब झाला.
भाव चांगला असल्याने
सध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला ५३०० ते ५५०० रुपये प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. यापुढे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी किमान चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला तरी ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागत आहे. त्यामुळे पांढºया सोन्याच्या संरक्षणासाठी आता शेतकºयांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. काही शेतकरी भितीपोटी पोलिसात तक्रार देत नाहीत. रात्रीच्या वेळी कापूस वेचणी करून ती रातोरात लंपास करण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर पाच ते सहा संख्येने चोरटे रात्री कापूस वेचनी करीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दहशतीचे वातावरण
पाच ते सहाच्या संख्येने चोरटे कापूस वेचणीसाठी येत असल्याचा अंदाजाने एकटा शेतकरी किंवा रखवालदार त्यांचा सामना करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी आता स्वत: गटागटाने शेत शिवारात गस्त घालण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
भाव समाधानकारक
सध्या कापसाला भाव समाधानकारक मिळत आहे. खेडा खरेदीत शेतकºयांना घरबसल्या ४८०० ते ५१०० रुपये भाव मिळत आहे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रतवारीनुसार थेट ५५०० रुपये भाव मिळू लागला आहे. ही बाब पहाता कापूस यंदा भाव खात असला तरी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Web Title: Thieves march to white gold now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.