तळोद्यातील ‘तिसरा डोळा’ निकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:12 AM2017-08-24T11:12:39+5:302017-08-24T11:12:39+5:30
सीसीटीव्ही कॅमेरे बंदच : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर दुरुस्तीची अपेक्षा
Next
ल कमत न्यूज नेटवर्कतळोदा : गुन्हेगारी प्रवृत्तीवर वॉच ठेवण्यासाठी शहरात लावण्यात आलेला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्ही कॅमेरा निकामी ठरला आहे. निदान पुढील गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर ही नादुरुस्त कॅमेरे तातडीने बदलण्याची अपेक्षा आहे. तशी मागणीदेखील जोर धरू लागली आहे.अलिकडे शहरात गुन्हेगारी कारवायांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. त्यातही तारकट तरूणांची संख्याही वाढली होती. साहजिकच छेड काढण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे या गुन्हेगारीस चाप बसण्यासाठी शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला होता. सन 2014 साली हे कॅमेरे बसविण्यात आले. आनंद मेडिकल, मारोती मंदिर, स्मारक चौक, खाज्या नाईक चौक व प्रशासकीय इमारत अशा वेगवेगळ्या सहा ठिकाणी हे सहा कॅमेरे लावण्यात आली. तथापि दीडच वर्षात ही कॅमेरे नादुरुस्त झाली. त्यामुळे ती आजही बंद पडली आहे. दुरुस्ती अभावी तशीच धुळखात पडली आहे. वास्तविक या कॅमे:यांमुळे त्यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीला खरोखर लगाम बसला होता. एवढेच नव्हे शहरात 2015 साली झालेल्या दंगलीतील गुन्हेगारांचा शोध देखील कॅमे:यांमुळेच लागला होता. हे कॅमेरे असे उपयोगी ठरत असताना ते बदलण्याबाबत प्रशासनाने उदासिन भूमिका घेतल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे कॅमेरे बंद झाल्यानंतर चैन स्नेचिंगच्या दोन-तीन घटनादेखील घडल्या होत्या. शिवाय तारकट व रोडरोमिडयोंची संख्या सुद्धा वाढली आहे. साहजिकच शहरातील नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. निदान शुक्रवारपासून सुरू होणा:या गणेश उत्सव व ईदच्या पाश्र्वभूमिवर तरी धुळखात पडलेले कॅमेरे तातडीने बदलण्यात यावे, अशी अपेक्षा आहे.