विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 06:23 PM2018-08-08T18:23:39+5:302018-08-08T18:23:45+5:30
आरटीई : निंम्याहून अधिक जागा अद्याप रिक्तच, मुंबईत झाली बैठक
नंदुरबार : समाजातील दुर्बल घटकांमधील विद्याथ्र्याना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाकडून शिक्षण हक्क कायदा ‘आरटीई’अंतर्गत अशा विद्याथ्र्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात़ परंतु नंदुरबारात कायद्यांतर्गत आतार्पयत निम्याहून अधिक प्रवेश बाकी असल्याची माहिती आह़े त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दुर्बल घटकातील विद्याथ्र्याना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांच्यासाठी 25 जागा राखिव ठेवण्यात येत असतात़ जिल्ह्यात 25 टक्केअंतर्गत 479 जागा आहेत़ परंतु आतार्पयत जेमतेम 137 विद्याथ्र्याचीच प्रवेश निश्चिती झाली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आह़े त्यामुळे अद्यापही निम्याहून अधिक जागा रिक्त असून प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात येत आह़े
43 शाळांचा समावेश
जिल्ह्यातील एकूण 43 शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु आह़े याबाबत तीसरी प्रवेशफेरी पूर्ण झाली असून त्यात 137 विद्याथ्र्याची प्रवेश निश्चिती झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आह़े अनेक वेळा पालक आपल्या पाल्यांस 25 टक्केअंतर्गत प्रवेश मिळावा म्हणून विविध शाळांमध्ये अर्ज करीत असतात़ त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अडचणी येत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े प्रवेश मिळावा म्हणून पालकांकडून करण्यात धडपड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े
‘सिलेक्टीव’ शाळांनाच प्राधान्य
25 टक्के प्रवेश प्रक्रिया पुणे येथील ‘एनआयसी’ सेंटरअंतर्गत चालविण्यात येत आह़े आतार्पयत 479 जागांसाठी 579 प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत़ परंतु अॅडमिशन घेण्यासाठी पालकांकडून सिलेक्टीव शाळांनाच प्राधान्य देण्यात येत आह़े 25 टक्केअंतर्गत प्रवेश प्रकिया जिल्ह्यातील 43 शाळांमध्ये सुरु असतानासुध्दा पालकांकडून केवळ 3 ते 4 शाळांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मिळत आह़े त्यामुळे इतर शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी घरघर असल्याचे दिसून येत आह़े
चौथी प्रवेश फेरी लवकरच
आरटीई प्रवेश प्रकियेअंतर्गत आतार्पयत तीन प्रवेश फे:या झालेल्या आहेत़ याअंतर्गत 137 विद्याथ्र्याचे प्रवेश निश्चित झाले असून अद्यापही 342 विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया बाकी आहेत़ चौथी प्रवेश फेरी 2 ते 4 दिवसात होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ आऱडी़ कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
शाळा उघडून उलटले दोन महिने
सीबीएसई व इतर शाळा उघडून जवळपास आता दोन महिने उलटतील परंतु तरीसुध्दा अद्याप आरटीईअंतर्गत अद्यापही 342 विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया बाकी असल्याची भिषण स्थिती आह़े याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाला विचारले असता, जिल्हास्तरावरुन प्रवेश प्रकियेस कुठलीही अडचण नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही पुणे येथील एनआयसी सेंटरकडून होत असत़े अनेक वेळा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणींअभावी व्यत्यय निर्माण होत असतो़ ही परिस्थती केवळ जिल्ह्याचीच नव्हे तर राज्यभरात सारखीच असल्याचे सांगण्यात आल़े
दरम्यान, शाळा उघडून बरेच दिवस झाले असल्याने विद्याथ्र्याचा अभ्यासक्रमसुध्दा ब:यापैकी पुढे गेलेला आह़े त्यामुळे आता नव्याने प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याच्या मागील अभ्यासक्रमाचे काय? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आह़े ऑनलाईन पध्दतींना ब:याच तांत्रिक अडचणी असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय़