बोकड विक्री व्यावसायिकाला ठार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:06+5:302021-07-15T04:22:06+5:30
याबाबत, मुस्लीम खाटीक समाज उन्नती मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले ...
याबाबत, मुस्लीम खाटीक समाज उन्नती मंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाचा आशय असा, जळगाव येथील जावेद रज्जाक खाटीक हे टेम्पोने बोकड व शेळ्या विक्रीसाठी कल्याण येथे जात असतांना मालेगावजवळ त्यांच्यावर लूटमारीचा उद्देशाने दरोडेखोरांनी गोळीबार केला. त्यात ते ठार झाले असून त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांपर्यंत याबाबतची मागणी व भावना पोहोचवावी. सदर घटनेचा शहादा तालुका खाटीक समाजातर्फे निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मुस्लीम खाटीक समाज उन्नती मंडळ शहादाचे अध्यक्ष इरफान बशीर खाटीक, उपाध्यक्ष हाजी युनुस अब्दुल सलाम खाटीक, सचिव हाजी हारून हाजी दगा खाटीक, संचालक प्रा.मेहमूद गुलाब खाटीक,हाजी मक्सुद गफ्फार खाटीक यांच्यासह अलाउद्दीन नबी खाटीक,मुनाफ शेख गुलाब खाटीक, नवाब सरदार खाटीक,हाजी महेमुद नबी खाटीक, सलीम भिकन खाटीक, सलीम बशीर खाटीक, सलिम शरफोद्दिन खाटीक, हारून नबाब खाटीक, मुश्ताक नामदार खाटीक, लियाकत गफूर खाटीक, मेहमूद गुलाब खाटीक आदिंची स्वाक्षरी आहेत.