साडेसात हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:22 PM2019-12-09T12:22:35+5:302019-12-09T12:22:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप ...

Thousands and thousands of damaged farmers wait for the end! | साडेसात हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपण्याची चिन्हे!

साडेसात हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपण्याची चिन्हे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली आहे़ पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई झाली होती़ परंतू जिल्ह्यात सात हजार शेतकरी भरपाईपासून वंचित असून या आठवड्यात त्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़
अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते़ एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतर त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती़ यातील पहिल्या टप्प्यातील १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित असून ती नेमकी कधी मिळणार, याबाब प्रशासनाकडेही ठोस अशी माहिती नाही़ परंतू ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत ३ हजार १५२ बाधित शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये वर्ग केले होते़ यात नंदुरबार तालुक्यातील ७८ शेतकºयांना ४ लाख ४१ हजार, नवापुर १ हजार ५५०, शहादा ५०९ तर धडगाव तालुक्यातील २९३ शेतकºयांना प्रत्येकी २७ लाख २१ हजार, तळोदा तालुक्यातील २२ शेतकºयांना ३३ हजार तसेच अक्कलकुवा तालुक्याच्या ७११ शेतकºयांना २७ लाख १९ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे़ उर्वरित ७ हजार ७३३ शेतकºयांना भरपाई मिळणार कधी याकडे लक्ष लागून होते़ या शेतकºयांसाठी २ कोटी रुपयांच्या भरपाई अनुदानाची मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे़ याबाबत प्रशासनातील अधिकाºयांनी गेल्या आठवड्यात नाशिक येथील बैठकीत रकमेची मागणी केली होती़ यातून चालू आठवड्यात ही रक्कम प्रशासनाकडे जमा होण्याची शक्यता आहे़

Web Title: Thousands and thousands of damaged farmers wait for the end!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.