टेंभे शिवारात हजार ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:55 AM2019-08-28T11:55:51+5:302019-08-28T11:55:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टेंभे, ता.शहादा शिवारात तब्बल हजार ब्रास वाळू जप्त केली तर नंदुरबार येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टेंभे, ता.शहादा शिवारात तब्बल हजार ब्रास वाळू जप्त केली तर नंदुरबार येथे एक वाहन जमा करण्यात आले.
तापी नदीपात्राशेजारील गावात अवैध वाळू आणि उत्खननाविरोधात कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या सुचनेनुसार जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण यांनी ही कारवाई केली. शहादा तालुक्यातील मौजे टेंभे येथे अवैधरित्या वाळूची साठवणूक आढळून आली. पंचनाम्यानुसार 997 ब्रास वाळू आहे. वाळूसाठा जप्त केला.
त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड शासकीय दौ:यावरून परतत असताना नंदुरबार शहराजवळ वाळू वाहतूक करणारे वाहन (क्रमांक एमएच-39 एडी 0350) आढळूल आले. वाहन चालकाजवळ वाळू वाहतूक परवाना आढळून न आल्याने सदर वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे.