हजारो दिव्यांनी उजाळले मोरवड, गुलाम महाराजांच्या स्मरणासाठी मोरवडला भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:47 PM2017-10-22T12:47:33+5:302017-10-22T13:01:44+5:30

आरती पूजन कार्यक्रम

Thousands of devotees visit Morvada to celebrate the memory of Morvad and Ghulam Maharaj | हजारो दिव्यांनी उजाळले मोरवड, गुलाम महाराजांच्या स्मरणासाठी मोरवडला भाविकांची मांदियाळी

हजारो दिव्यांनी उजाळले मोरवड, गुलाम महाराजांच्या स्मरणासाठी मोरवडला भाविकांची मांदियाळी

Next
ठळक मुद्देशौचालय बांधून त्याचा वापर करण्याचे आवाहनमहिलांनी हातात आरती घेवून समाधी स्थळार्पयत गेले

गुलाबसिंग गिरासे/ऑनलाईन लोकमत

बोरद, जि. नंदुरबार, दि. 22- मोरवड, ता.तळोदा येथे आपमुळ धर्म सतीपती आरती पूजनाचा धार्मिक उपक्रम गुरूवारी मोठय़ा उत्साहात पार पाडला. या वेळी लक्ष्मण महाराज व चंद्रसेन महाराजांनी भाविकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत शासनाच्या शौचालय बांधकामा करीता येणा:या शासकीय निधीतून शौचालय बांधून त्याचा वापर करण्याचे आवाहन ही केले.
या वेळी माजीमंत्री तथा आमदार विजयकुमार गावीत, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, प्रांताधिकारी विनय गोवडा, डॉ.भरत वळवी, डॉ.कांतीलाल टाटीया, रूपसिंग पाडवी, ङोलसिंग पावरा, हिरामण पाडवी, वीरेंद्र वळवी, किसन  महाराज, प्रकाश ठाकरे, डॉ.गजानन डांगे, सत्यवान पाडवी, पोलीस उपनिरीक्षक भदाणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले की, जिल्ह्यातील मोरवड उर्फ रंजनपूर हे गाव संत गुलाम महाराज व संत रामदास महाराजांपासून क्रांतीकारी गाव आहे. या गावातून ब्रिटिशांविरूद्ध लढेही लढले गेले होते. आदिवासी समाजात ख:या अर्थाने जनजागृतीचे काम गुलाम महाराज यांनी केले. त्यामुळे आप चळवळ जिल्ह्यात रूजली. ही चळवळ मजबूत झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले. अॅड.पद्माकर वळवी यांनी मोरवड गावाची शासनाने दखल घेवून त्यास पर्यटन स्थळ जाहीर करून पालकमंत्री तथा पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल यांनी विकास कामासाठी तीन ते चार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी मोरवड गावाच्या विकासाकरीता जिल्हा नियोजन समिती व शासनाकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
दरम्यान दिवसभर भजन-कीर्तन सादर करून रात्री नऊ वाजता चंद्रसेन बाबांच्या घरापासून संत गुलाम महाराज व संत रामदास महाराज आणि माता दगू यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी हातात आरती घेवून समाधी स्थळार्पयत गेले. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील भाविकांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. समाधी स्थळावर मिरवणूक पोहोचल्यानंतर आरती करण्यात आली. 
आरती पूजनाच्या कार्यक्रमास सहभागी होण्याकरीता पायी येणा:या भाविकांसाठी मोड, बोरद, सोमावल, मोदलपाडा व प्रतापपूर येथील ग्रामस्थांकडून अल्पोपहार देण्यात आला. 
कार्यक्रम यशस्वितेसाठी तळोदा पंचायत समितीेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, मोरवड सरपंच प्रविण वळवी, नारायण ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Thousands of devotees visit Morvada to celebrate the memory of Morvad and Ghulam Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.