शिक्षण विभागाच्या वसतीगृहातून ५० हजाराचे विजेचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:31 PM2020-01-04T12:31:22+5:302020-01-04T12:31:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतीगृहातून ५० हजार रुपयांचे वीजेचे ...

Thousands of electricity were dumped from the hostel of the Education Department | शिक्षण विभागाच्या वसतीगृहातून ५० हजाराचे विजेचे साहित्य लंपास

शिक्षण विभागाच्या वसतीगृहातून ५० हजाराचे विजेचे साहित्य लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मुलींच्या वसतीगृहातून ५० हजार रुपयांचे वीजेचे साहित्य चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे़ गणेश बुधावल ता़ तळोदा येथे हे वसतीगृह असून २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान चोरीचा हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे़
गणेश बुधावल येथे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे हंगामी वसतीगृह आहे़ याठिकाणी बांधकाम सुरु करण्यात आले आहे़ आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान येथील ३१ हजार ५०० रुपयांचे ६३ पंखे, ३ हजार ३०० रुपयांचे ३३ ट्यूब लाईट, ६ हजार ९०० रुपयांचे सीएफएल बल्ब, १ हजार ६५० रुपयांचे ११ स्ट्रीट लाईट, १ हजार २५० रुपयांचे फायबर बोर्ड, ५ हजार रुपयांची पाण्याची मोटार, १ हजार ३५० रुपयांचे २७ नळ असा ५० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघड झाले होते़ दरम्यान अज्ञात व्यक्तींनी चोरीसोबतच ४० हजार रुपयांचे दरवाजे तोडून नुकसानही केले होते़ ही बाब संबधित विभागाच्या लक्षात आल्यानंतर चौकशी करण्यात आली होती़ परंतू योग्य ती माहिती न मिळाल्याने अखेर गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले़
यानुसार विशाल पुरुषोत्तम पाटील रा़ शहादा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़ याप्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़

केंद्र शासनाने जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाला दिलेल्या विशेष निधींतर्गत २०१८ मध्ये गणेश बुधावल येथील हे वसतीगृह बांधून पूर्ण करण्यात आले आहे़ वसतीगृहात यंदाच्या वर्षापासून मुलींना प्रवेश अपेक्षित होता़ परंतू तशी कोणतीही कारवाई झालेली नाही़ बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चोरी झाल्याचे संबधित विभागाच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे़ आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या चोरीप्रकरणी थेट जानेवारी २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ सध्या वसतीगृहात कोणीही कर्मचारी किंवा विद्यार्थिनी नसल्याने कोट्यावधी रुपयांचे हे बांधकाम ओस पडून असल्याने लुटालुट सुरु आहे़

Web Title: Thousands of electricity were dumped from the hostel of the Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.