सारंगखेडा यात्रोत्सवात हजारांहून अधिक अश्व दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:48 PM2017-11-30T13:48:08+5:302017-11-30T13:48:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जगभरात सारंखेडा यात्रा घोडे बाजारासाठी मोठी बाजार पेठ आह़े या यात्रेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरातसह देशाच्या कानाकोप:यातून हजारो जातिवंत अश्व विक्रीसाठी 15 दिवस अगोदर दाखल होत असतात. आतार्पयत या यात्रेत एक हजार 200 हून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अश्व विक्रेत्यांनी गैरसोय होऊ नये म्हणून शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मुलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवास 3 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाचे 3 डिसेंबर ते 3 जानेवारी र्पयतचे नियोजन आहे.
चेतक फेस्टिवलच्या विविध कार्यक्रमांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रमुख आकर्षण म्हणून गीतगायन (व्हॉईस ऑफ सारंगखेडा) व समूह नृत्य स्पर्धासाठी 12 नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धासाठी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, अशा विविध राज्यातील कलाकारांनी नाव नोंदणी केली आहे.
समूह नृत्य स्पर्धेत प्रथम येणा:यास एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 51 हजार व तृतीय 31 हजार रुपये आहे. तसेच गितगायन स्पर्धेत प्रथम येणा:यास 51 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 31 हजार व तृतीय 21 हजार रुपये आहे.
चेतक फेस्टिवल अंतर्गत महिलांसाठीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महिला समिती नेमण्यात आली आहे .यामध्ये महिलांसाठी मिसेस सारंगी नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच चेतक फेस्टिवल नावाची चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात्रेविषयी संपूर्ण माहिती चेतक फेस्टिवलच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून, संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
स्पर्धा संपूर्ण भारतभरातून आलेल्या कलाकारांसाठी खुली असून, युवकांसाठी महिलांसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.