ब-हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर रिक्षा-दुचाकी अपघतात तिघांचा भाजून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:15 PM2018-03-19T12:15:46+5:302018-03-19T12:15:46+5:30
दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 19 : ब:हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावरील राजमोही फाटय़ावर दुचाकी व प्रवाशी रिक्षा यांच्यात धडक झाल्यानंतर दुचाकीने पेट घेतल्याने तिघे जण गंभीर भाजल़े यात दोघांचा जागीच तर एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला़
मामटा हांद्या वळवी रा़ पलास खोबरा, सुनील शिपा वसावे रा़ खुंटागव्हाण व दिलीप मोत्या वसावे रा़ डाब ता. अक्कलकुवा असे मयतांची नावे आहेत. हे तिघे (एमएच 39 ए 9037) दुचाकीने अक्कलकुवा येथून तळोद्याकडे जात असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राजमोही फाटय़ाजवळ समोरून येणा:या तीनचाकी अॅपेरिक्षावर (क्रमांक एमएच 39-टी4638) धडकल़े दोघा वाहनांचा वेग हा अधिक असल्याने धडक दिल्यानंतर दुचाकीने तात्काळ पेट घेतला़ यात मामटा वळवी आणि सुनील शिपा वसावे हे दोघेही दुचाकीखाली अडकल्याने भाजले गेल़े दोघांच्या शरीराने पेट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तर दिलीप वसावे याला गंभीर जखमा झाल्या़ त्याला स्थानिकांच्या मदतीने पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केल़े याठिकाणी उपचार सुरू असताना दिलीप वसावे याचा मृत्यू झाला़ अर्धा तासार्पयत रस्त्यावर पडून असलेल्या तिघांना वेळीच मदत मिळू शकली नाही़ धडकेत रिक्षाचालक कालुसिंग रघुसिंग पाडवी रा़ इच्छागव्हाण ता़ तळोदा हाही गंभीर जखमी झाला़ त्याला अधिक उपचारांसाठी नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आह़े रात्री उशिरार्पयत पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल मोहन शिरसाठ, पी़ओ़नाईक, सुनील पाडवी, प्रविण पटेल, शरद पाटील यांनी मयताच्या कुटूंबियांचा शोध घेत, त्यांची ओळख पटविली़