तीन दिवसांनी थंडी पुन्हा परतणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 11:53 AM2019-02-06T11:53:28+5:302019-02-06T11:53:38+5:30
वातावरणात बदल : कमाल व किमान तापमानात होणार घट
नंदुरबार : खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात सध्या किमान व कमाल तापमानात पुढील तीन ते चार दिवस राहून पुन्हा थंडी परतणार आह़े परंतु या थंडीची तीव्रता अधिक राहणार नसल्याचे पुणे येथील ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात किमान तापमानात वेगाने वाढ झाली आह़े बंगालच्या उपसागरात बाष्पीभवनाची गती वाढली आह़े त्यामुळे पुव्रेकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींना अडथळा निर्माण झाला आह़े परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात किमान व कमाल तापमानात वाढ झाली आह़े परंतु ही स्थिती पुढील तीन ते चार दिवसच राहणार आह़े त्यानंतर पुन्हा थंडी परतेल़ परंतु जानेवारीत ज्या प्रकारे कोरडय़ा थंडीची तीव्रता होती, तशी थंडी जाणवनार नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात वातावरणीय बदल होताना दिसून येत आह़े
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारात ढगाळ हवामान दिसून येत आह़े त्यामुळे हरभरा पिकाला धोका निर्माण झाला आह़े अजून दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आह़े