कोठली ग्रामस्थ तीन दिवसानंतर परतले गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:08 PM2019-08-12T13:08:55+5:302019-08-12T13:09:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : कोठली त.ह., ता.शहादा गावालगत वाहणा:या वाकी नदीचे पाणी गुरुवारी गावात शिरले व गावाला संपूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोठली त.ह., ता.शहादा गावालगत वाहणा:या वाकी नदीचे पाणी गुरुवारी गावात शिरले व गावाला संपूर्ण वेढा दिला. ग्रामस्थांनी घाबरुन त:हाडी, औरंगपूर, कुढावद या गावांमध्ये आसरा घेतला. शनिवारी पाणी ओसरल्यानंतर हे ग्रामस्थ गावात परतले.
जि.प. सदस्य अभिजित पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पाटील यांनी तात्काळ शहादा येथून ग्रामस्थांना पिण्यासाठी पाण्याचे टँकर मागवून भोजनाची व्यवस्था करून दिली. कोठलीतर्फे हवेली या गावात पाणी घुसल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतीचेही नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणीही अभिजित पाटील यांनी केली आहे. या वेळी महेंद्र पाटील, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, डॉ.दिनेश पाटील, किशोर पाटील, चंपालाल पाटील, भालचंद्र चौधरी, अमोल पाटील, विकास राव, सागर पाटील, उमेश पाटील, अनिल चौधरी, कैलास सोनवणे, मनीष पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, कोठली गावालगत वाहणा:या वाकी नदीला संरक्षण भिंत नसल्याने नदीचे पाणी थेट गावात शिरले. त्यामुळे काही घरांची पडझड झाली तर काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.