प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:19 PM2019-07-09T12:19:01+5:302019-07-09T12:19:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने येथून ...

Three doors of light barrage opened | प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

प्रकाशा बॅरेजचे तीन दरवाजे उघडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील बॅरेजचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याने येथून 3 हजार 645 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु झाला आह़े रविवारी रात्री 10 वाजता बॅरेज प्रकल्प विभागाने ही कारवाई केली़
मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या जलस्तरात वाढ झाल्याने हतनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊन पाणी सोडण्यात आले आह़े यामुळे सुलवाडे, सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमध्ये जलसाठा वाढून पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सारंगखेडा बॅरेजचे दोन गेट आधीच अर्धा मीटरने उघडले गेले होत़े दरम्यान रविवारी रात्री प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आल़े
पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने प्रकाशा बॅरेजची पाणी पातळी 107़70, तर  सारंगखेडा बॅरेजची पातळी ही 110़20 मीटर असल्याची माहिती आह़े जलस्तर तासागणिक वाढत असल्याने मासेमारांसह नागरिकांनी पाण्यात उतरु नये असे बॅरेज प्रकल्प विभागाचे उपअभियंता वरुण जाधव यांनी कळवले आह़े पाणीपातळीत आणखी वाढ होणार असल्याचे प्रकल्प विभागाने कळवले आह़े
 

Web Title: Three doors of light barrage opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.