तीन आरोग्य केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 12:07 PM2018-08-04T12:07:02+5:302018-08-04T12:07:09+5:30
नंदुरबार : जिल्हा परिषदेने 15 कोटी रूपयांचा निधी उभारून तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम पूर्ण केले आह़े बांधकामानंतर ते कार्यान्वित होणे रास्त असताना विद्युतीकरण नसल्याने या वास्तू पडून आहेत़ विद्युतीकरणासाठी बांधकाम विभागाने राज्यस्तरावर दिलेला प्रस्तावही मान्य झालेला नसल्याने या केंद्रांना उद्घाटनाची प्रतिक्षा आह़े
2016-17 या आर्थिक वर्षापासून धुळीपाडा ता़ नवापूर, पिंपळखुटा आणि वेली ता़ अक्कलकुवा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी देण्यात येऊन सर्वसाधारण पाच कोटी रूपयांप्रमाणे 15 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता़ यात इमारतीत विद्युतीकरण करण्याच्या कामासाठी निधी मंजूर होता़ हा निधी बांधकाम विभागाच्या पुणे आणि नाशिक येथील वरिष्ठ कार्यालयांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खर्च करण्याचे सूचित केले होत़े परंतू गेल्या वर्षापासून बांधकाम विभागाने नाशिक आणि पुणे येथील बांधकाम विभागाच्या ईलेक्ट्रीकल विभागाकडे देऊनही त्यांनी प्रस्तावांना मंजूरी दिलेली नाही़ परिणामी चांगल्या दर्जाच्या वास्तू पडून आहेत़ ज्या हेतूसाठी या इमारतींची उभारणी करण्यात आली आह़े यातून आरोग्यसेवेचा हेतूही साध्य होऊ शकलेला नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आह़े विशेष बाब म्हणजे याबाबत जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विस्तृत चर्चा होऊनही हा विषय मार्गी लागलेला नाही़ मिळालेल्या माहितीनुसार निविदा प्रक्रिया येत्या मार्च 2019 नंतर पूर्ण होणार असून आणखी या तीन इमारतींसोबत मोदलपाडा ता़ तळोदा वाण्याविहिर, आणि वडफळी ता़ अक्कलकुवा आणि पुरूषोत्तमनगर ता़ शहादा या आरोग्य केंद्रांच्या नूतन इमारती 2020 मध्ये रूग्णसेवा देण्यासाठी खुल्या होणार असल्याचे वृत्त आह़े धुळीपाडा, वेली आणि पिंपळखुटा या तीन आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीतच पाच ते सहा लाख रूपयांची तरतूद होती़ या रकमेतून विद्युतीकरणासाठी लागणारा प्रस्तावित कारवाईची सव्वा टक्का रक्कम जिल्हा परिषद बांधकाम विभागाने भरून देत प्रस्ताव पुणे येथील कार्यालयाकडे दिला आह़े यावर अद्याप कारवाई झालेली नाही़ एकीकडे वरील तीन आरोग्य केंद्राचे विद्युतीकरणाचे प्रस्ताव दिले गेले असले तरी बांधकाम सुरू असलेल्या काकर्दे, राजबर्डी, झापी ता़ धडगाव व भालेर ता या आरोग्य केंद्रांच्या बांधकामांच्या विद्युतीकरणाच्या कामांचे प्रस्तावही टांगणीला आहेत़ सामान्यरित्या बांधकाम होत असतानाच त्यात विज पुरवठा करण्यासाठी सोय केली जात़े परंतू या सर्व आरोग्य केंद्रांपैकी केवळ वेली येथेच काहीअंशी सोय आह़े उर्वरित ठिकाणी निविदा मंजूर झाल्यानंतर पुन्हा तोडफोड करूनच विद्युतीकरणाचे काम सुरू होईल़ यातून चांगल्या वास्तूंची पुन्हा धूळधाण होण्याची शक्यता आह़े
वडफळी, मोदलपाडा, वाण्याविहिर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आह़े परंतू तेथील विद्युतीकरणाच्या कामाबाबतही उदासिनता आह़े बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यांचे उद्घाटन थेट 2020 मध्येच होण्याची शक्यता आह़े