ट्रक अपघातात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:39 AM2020-05-11T11:39:23+5:302020-05-11T11:39:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : चरणमाळ घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होउन झालेल्या अपघातात तीन जण ...

Three injured in truck accident | ट्रक अपघातात तीनजण जखमी

ट्रक अपघातात तीनजण जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : चरणमाळ घाटातील अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होउन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. १०८ रूग्णवाहिका वेळीच दाखल झाल्याने जखमींवर वेळीच उपचार होउ शकले.
पोलीस सुत्रानुसार आज सकाळी चरणमाळ घाटात ट्रक (क्रमांक जीजे ०३ ई ९९९६) पिपंळनेर कडून सुरतेकडे जात असतांना घाटातील अवघड वळणावर ट्रक नियंत्रित न झाल्याने पलटी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. मुकेशभाई मोहन कोठडीया (४०) राजकोट, अमीकास रामसुदंर (२५) उत्तर प्रदेश, भैयाराम देवलले (३१) उत्तर प्रदेश या तीघांचा जखमीत समावेश आहे. ट्रक पलटी झाल्याने मोठा आवाज ऐकुन स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. लॉकडाऊन सुरू असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या कोणत्याही वाहनाने किंवा लोकांनी मदत केली नाही. घटनेची खबर मिळताच १०८ रूग्णवाहीका मदतीला धावुन आल्याने जखमींना तात्काळ उपचार मिळाले. डॉ.राहुल सोनवणे व लाजरस गावीत यांनी प्रथमोपचार करुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या बाबत नवापुर पोलिस ठाण्यात ट्रक चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर रूग्णवाहिका आली नसती तर आमगचं काय झालं असतं अशी भावनिक प्रतिक्रीया एका जखमीने व्यक्त केली.

Web Title: Three injured in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.