तीन लाखांचा दारुसाठा जप्त : अक्कलकुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:21 PM2018-03-06T12:21:04+5:302018-03-06T12:21:04+5:30
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 6 : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे अक्कलकुवा येथे झालेल्या कारवाईत 2 लाख 88 हजार रुपये किमतीचा दारुसाठा व इतर ऐवज जप्त करण्यात आला आह़े विभागाकडून रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली़
अक्कलकुवा येथील एका किराणा दुकानात अवैधरित्या दारुची विक्री करण्यात येत होती़ ही बाब नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला समजताच या ठिकाणी धाड टाकण्यात आली़ दुकाणाची तपासणी केली असता, त्यात राज्यात विक्रीस मनाई असलेला 2 लाख 88 हजार रुपयांचा दारुसाठा आढळून आला़ या प्रकरणी संजय परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या कारवाईत, विभागीय आयुक्त प्रसाद सूव्रे, अधिक्षक नितीन घुले, निरीक्षक मनोज संबोधी, साहाय्यक दुय्यम निरीक्षक डी़डी़ बागले, मोहन पवार, सुनील पवार, अविनाश पाटील, नितीन ठणके आदींचा समावेश होतो़