युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून मुलीसह तिघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:10 PM2019-08-30T12:10:12+5:302019-08-30T12:10:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीचा नाद सोडण्यासंदर्भात फोनवरून धमकी दिल्यामुळे नृत्य शिक्षक असलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना नंदुरबारात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुलीचा नाद सोडण्यासंदर्भात फोनवरून धमकी दिल्यामुळे नृत्य शिक्षक असलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी युवकाच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून मुलीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहतर वस्तीत राहणारा सागर गोविंद थनवार (26) या नृत्य शिक्षक असलेल्या युवकाने 28 रोजी सायंकाळी घरातच गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे एका युवतीवर प्रेम होते. त्यातून युवतीचा भाऊ आणि काका हे त्याला फोनवर धमकी देत होते. मुलीचा नाद सोड अन्यथा मारून टाकू अशी धमकी त्याला दिली जात होती. मुलीचे काका देखील धमकी देत होते. शिवाय जातीवाचक बोलत होते. ते सागर याच्या मनाला लागल्याने त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याचे नातेवाईक कुंदन चिमन थनवार यांनी दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून युवतीसह तिचे काका आणि भाऊ तनय चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर परिसरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून आत्महत्येस प्रवृत्त करणा:या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यावर नातेवाईक शांत झाले.