गणोर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:18 AM2019-03-14T11:18:39+5:302019-03-14T11:19:04+5:30

गणोर शिवार : वनविभागाकडून उपाययोजना, भितीचे वातावरण

Three people were injured in Leo's attack in Ganore Shivar | गणोर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीनजण जखमी

गणोर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीनजण जखमी

Next

म्हसावद : गणोर शिवारात बुधवारी बिबट्याने स्थानिक शेतकऱ्यांवर दोनदा हल्ला केला. या हल्यात तीन जण जखमी झाले असून, त्यांना म्हसावद ग्रामीण रुग्णालयातून नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत असे की, अंबापूर-गणोर शिवारात एक ते दीड महिन्यापासून बिबट्याची दहशत आहे. दरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजता आडगाव येथील कैलास यासींग ठाकरे (४०) हा शेतात शेळ्या चारत असतांना बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र प्रतिरोध केल्याने पळण्यात यशस्वी झाला. गावात येवून संगितल्याने गावातील लोक लाढ्या-काठ्या घेवून शेतात बिबट्याच्या शोधार्थ गेले. त्या वेळी साडे दहा वाजता बिबट्याने दिलवरसिंग बजरंग निकुंभ (३४) रा.गणोर, अनिल विजय रावताळे (२१) रा.आडगाव यांच्यावर हल्ला करून जमखी केले.
सद्य:स्थितीत बन्सीलाल सजन भामरे रा. गणोर, यांच्या गव्हाच्या शेतात बिबट्याने आश्रय घेतला आहे. या भागात दोन पिंजरे, पाच सी.सी.टीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, दिवसा २५ कर्मचारी, रात्री २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
घटना स्थळी वनसंरक्षक एस.बी. केवटे, सहायक वनसंरक्षक एस.आर. चौधरी यांनी भेट दिली असून, वनक्षेत्रपाल एस.के. खुणे, पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनराज निळे, पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देवून पंचनामा केला. वनपाल बी.के. थोरात, आर.जी. लामगे, पी.आर. नीळे, व्ही.ए. भदाणे, वनरक्षक, वनकर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
यामुळे शेतकरी, शेतमजूर यांच्यात भितीचे वातावरण आहे.

Web Title: Three people were injured in Leo's attack in Ganore Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.