जिल्हा परिषदेसाठी दुपारी १२ पर्यंत २४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:16 PM2020-01-07T12:16:06+5:302020-01-07T13:01:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हातील हा सहा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी दुपारी १२ ...

Three percent voting for Zilla Parishad in three hours | जिल्हा परिषदेसाठी दुपारी १२ पर्यंत २४ टक्के मतदान

जिल्हा परिषदेसाठी दुपारी १२ पर्यंत २४ टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हातील हा सहा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत २४़८७ टक्के मतदान झाले़ दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा तसेच नवापुर तालुक्यात मतदान केंंद्रांवर सर्वाधिक मतदानाची नोंद असून दुपारीही मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याचे दिसून येत होते़
सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५६ आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी मतदार सकाळी सातपासून रांगा लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले होते़ दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा आणि नवापुर तालुक्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला़
जिल्ह्यात सर्व सहा तालुक्यात १ हजार २२९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून १० लाख ४ हजार ८७३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक ६४ उमेदवार व पंचायत समितीसाठीही सर्वाधिक ९७ उमेदवार शहादा तालुक्यात आहेत.
दुपारी १२ वाजेपर्यंत अक्कलकुवा तालुक्यात २६़८१ टक्के, धडगाव तालुक्यात १७़९६ टक्के, तळोदा तालुक्यात २५़२५ टक्के, शहादा तालुक्यात २२़२५ टक्के, नंदुरबार २६़११ टक्के तर सर्वाधिक २९़़७८ टक्के मतदान नवापुर तालुक्यात पार पडले होते़ अक्कलकुवा, धडगाव आणि नवापुर तालुक्यात मतदानाचा जोर वाढल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात दुपारपर्यंत २ लाख ४९ हजार ८९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ यात १ लाख २४ हजार ४३७ महिला तर १ लाख २५ हजार ५५३ पुरुष मतदारांचा समावेश आहे़
नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा तालुक्यातील प्रत्येकी दहा गट व २० गणांसाठी आणि धडगाव तालुक्यात सात गट व १४ गण तर तळोदा तालुक्यात पाच गट व १० गणांसाठी निवडणूक होत आहे. चारही प्रमुख पक्षांनी अर्थात भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादी यांनी यंदा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय भारतीय कम्युनिष्ट पार्टी, प्रहार, मनसे यांनीही काही ठिकाणी उमेदवार दिले आहेत. अनेक अपक्ष देखील रिंगणात आहेत. कुठेही आघाडी किंवा युती नसल्याने तिरंगी व चौरंगी लढती रंगल्या आहेत. पोलिसानीही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मतमोजणी बुधवार, ८ रोजी त्या त्या तालुकास्तरावर होणार आहे.

 

Web Title: Three percent voting for Zilla Parishad in three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.