मारहाणप्रकरणी तिघांना दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:00 PM2018-11-29T13:00:07+5:302018-11-29T13:00:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेतीच्या वादातून पती-प}ीसह मुलाला बेदम मारहाण करणा:या तीन संशयीत आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये ...

Three sentenced to fines | मारहाणप्रकरणी तिघांना दंडाची शिक्षा

मारहाणप्रकरणी तिघांना दंडाची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेतीच्या वादातून पती-प}ीसह मुलाला बेदम मारहाण करणा:या तीन संशयीत आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंड व जखमींना प्रत्येकी हजार रुपये देण्याचे आदेश दिले. अक्कलकुवा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी हे आदेश बुधवारी दिले.
या खटल्याची संक्षीप्त हकीकत अशी : मोवानचा पाटीलपाडा, ता.अक्कलकुवा येथील मोगराबाई तिरसिंग वसावे हे त्यांचा पती तिरसिंग व मुलगा मानसिंग वसावे  यांच्यासोबत राहतात. दमण्या वसावे यांच्यासोबत त्याचा शेतीवरून वाद होता. 
31 ऑगस्ट 2016 रोजी त्यांच्यात वाद होऊन दमण्या दौल्या वसावे, लिलाबाई दमण्या वसावे, गणेश दमण्या वसावे, सुरेश पारता वसावे हे लाठय़ा काठय़ा घेवून तिरसिंग वसावे यांच्या घरी गेले. तेंव्हा मोगराबाई ही समजविण्यासाठी गेली असता तिला मारहाण करण्यात आली. तिला सोडविण्यासाठी तिरसिंग व मानसिंग गेले असता त्यांनाही चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर गावक:यांनी तिघांची सुटका केली. 
शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी या चौघांनी दिल्याची फिर्याद मोगराबाई वसावे यांनी दिली होती. मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 
हवालदार सुनील बागुल यांनी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.  न्या.करभाजन यांनी साक्षीपुरावे लक्षात घेवून मयत दमण्या वसावे याला वगळता लिलाबाई दमण्या वसावे, गणेश दमण्या सावे, सुरेश पारता वसावे यांना दोषी धरून प्रत्येकी 500 रुपये दंड व जखमींना प्रत्येकी हजार रुपये देण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे अॅड.अजय सुरळकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सतीदान राऊळ होते.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी दमण्या दौल्या वसावे हे खटला सुरू असतांनाच्या काळात मयत झाले होते.    

Web Title: Three sentenced to fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.