धडगावात तीन दुकाने आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:58 PM2018-09-03T15:58:52+5:302018-09-03T15:59:05+5:30
20 लाखांचे नुकसान : प्रशासनाकडून पंचनामे; नुकसानग्रस्तांची भरपाईची मागणी
धडगाव : मुख्य बाजारपेठेत तीन दुकानांना अचानक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली़ आग विझविण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रय} केले. पहाटेर्पयत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आगीचे कारण समजू शकले नाही. प्रशासनाकडून आगग्रस्त दुकानांचा पंचनामा करण्यात आला.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील पाटीलबाबा चौकालगत विविध प्रकारची दुकाने आहेत. रात्री दहाच्या सुमारास दुकानातून धुरनिघत असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. आग विझविण्यासाठी नागरीकांनी एकच धावपळ केली, तोर्पयत आगीने रौद्ररूप धारण करत तीन दुकाने भस्मसात केली. यामध्ये एक हॉटेल, एक प्लास्टीक ताडपत्री विक्रीचे दुकान तर एका फूटवेअर दुकानाचाही समावेश आहे. घटनास्थळी उपस्थित नागरीकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या परिने शर्थीचे प्रय} करून रात्री एक वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
आगीचे रौद्ररूप पहाता बाजारपेठेतील एकापाठोपाठ एक दुकान जळण्यास सुरुवात झाली होती. मात्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे व मदतकायार्मुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. शहरात आपत्कालीन परिस्थितीत आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब किंवा इतर यंत्रणा नसल्याने नागरीकांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेजारील बोअर, हातपंप, टँकर यांची मदत घ्यावी लागली. यावेळी आर.पी. पेट्रोलीयम या पेट्रोलपंपावरून बारा अग्निशमन सिलींडरच्या सहाय्याने आग ओटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीतील नुकसानग्रस्त दुकानांचा प्रशासनामार्फत पंचनामा करण्यात आला. यामध्ये प्लास्टीक ताडपत्री विक्रेते रवींद्र नथ्थू साठे यांचे साडेचार लाख तर दुकान मालक जालमसिंग नटवर पावरा यांचे एक लाख 80 हजार रुपये, हॉटेल व्यावसायिक लताबाई प्रकाश रामोळे यांचे चार लाख 15 हजार रुपये तर फूटवेअर दुकान मालक फीरोज युसुफ शेख यांचे सहा लक्ष रुपये तर दुकान मालक दिलवरसिंग इंद्रसिंग पावरा यांचे दोन लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यात नोंद करण्यात आला आहे. तलाठी के.जी. पावरा, बी.यु. बडे, अमोल बोरसे, तहसील लिपीक किशोर राठोड व कोतवाल अनिता मक्राणे यांनी प्रशासनातर्फे पंचनामा केला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती, पोलीस पाटील धनसिंग पावरा, नगरसेवक प्रल्हाद भोई, भाऊराव पाटील, लतेश मोरे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.